loader
Breaking News
Breaking News
Foto

फणसवणे प्रकरणातील आरोपीवर कडक कारवाई करा : जाकीर शेकासन

संगमेश्वर (प्रतिनिधी) : संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे येथे घडलेल्या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हा अध्यक्ष जाकीरभाई शेकासन यांनी केली आहे. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी त्यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधून पुढील कारवाईबाबत चर्चा केली. फिर्यादी या अल्पसंख्यांक सेलच्या जिल्हा उपाध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडे यासंदर्भात दाद मागणार असल्याचे जाकीर शेकासन यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

फणसवणे येथे घडलेल्या या प्रकरणामुळे परिसरात चर्चा निर्माण झाली असून, संबंधित प्रकरणाची पोलीस यंत्रणेने गांभीर्याने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रकरणातील आरोपीवर कायद्यानुसार कडक कारवाई व्हावी, तसेच फिर्यादीला न्याय मिळावा, यासाठी आपण पोलीस अधीक्षकांकडेही मागणी करणार असल्याचे जाकीरभाई शेकासन यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणासंदर्भात संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांकडून माहिती घेण्यात आली असून, उपलब्ध तथ्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी सुरू असून, तपासातून समोर येणार्‍या बाबींनुसार पुढील कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले. फणसवणे परिसरातील नागरिकांमध्येही या प्रकरणाबाबत चर्चा असून, पोलिसांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणार्‍यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यासंदर्भात राज्य अल्पसंख्यांक आयोगकडे दाद मागणार असल्याचे जाकीर शेकासन यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg