loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचा सामाजिक उपक्रम; शेवंती दुर्गवले यांना अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते श्रवणयंत्र प्रदान

मंडणगड (प्रतिनिधी) - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीच्या वतीने मंडणगड तालुक्यातील पाले येथे सामाजिक बांधिलकी जपत कर्णबधिर वयोवृद्ध महिला शेवंती दुर्गवले यांना मोफत श्रवणयंत्र प्रदान करण्यात आले. भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते हे श्रवणयंत्र देण्यात आले. श्रवणशक्ती कमी झाल्यामुळे दैनंदिन जीवनात कुटुंबीय तसेच इतरांशी संवाद साधताना शेवंती दुर्गवले यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. श्रवणयंत्रामुळे त्यांना आता दैनंदिन संवाद साधणे अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. गरजू व्यक्तीच्या जीवनात दिलेला छोटासा आधारही तिच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो, याचा प्रत्यय या उपक्रमातून आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी महिला कार्यकर्त्या सलोनी दुर्गवले म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प’ अभियानाच्या माध्यमातून समाजातील गरजू, वंचित आणि दुर्लक्षित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचे काम होत आहे. भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते आणि जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या पुढाकारातून पाले येथील शेवंती दुर्गवले यांना मोफत श्रवणयंत्र मिळाल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनातील संवाद अधिक सुलभ होणार आहे. सामाजिक उपक्रम केवळ मदतीपुरते मर्यादित न राहता गरजू व्यक्तीच्या जीवनात आत्मविश्वास आणि आपलेपणाची भावना निर्माण करणारे असावेत. या उपक्रमातून समाजसेवेची हीच भावना पुढे नेली जात आहे.”

टाईम्स स्पेशल

या उपक्रमावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष विजय दुर्गवले, बाबुराव दुर्गवले, नितीन दुर्गवले, प्रथमेश दुर्गवले, तेजस दुर्गवले, चंद्रकला दुर्गवले, अंजली दुर्गवले, वैशाली दुर्गवले, सानवी दुर्गवले, सलोनी दुर्गवले, राणी दुर्गवले, एकता दुर्गवले, प्रजीत दुर्गवले, वेदांत दुर्गवले, प्राची दुर्गवले, साक्षी दुर्गवले, शांताराम दुर्गवले, शशिकांत दुर्गवले, सायली दुर्गवले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg