loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य डॉ. एस.एस.अली यांची नवी दिल्लीच्या स्कूल इन्स्पेक्शन कमिटीवर निवड

श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज (CBSE), वेरळ, शालेय शिक्षण क्षेत्रातील दीर्घ अनुभव, शैक्षणिक प्रशासनातील योगदान, गुणवत्ता-केंद्रित कार्यपद्धती तसेच CBSE प्रणालीची सखोल जाण असणारे प्रशालेचे प्राचार्य डॉ. शय्यद अली त्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय कार्याची दखल घेत राष्ट्रीय स्तरावरील शाळा तपासणी कमिटीवर निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे संपूर्ण समर्थ कृपा परिवारात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थेसाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची बाब ठरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

CBSE संलग्न शाळांच्या शैक्षणिक व प्रशासकीय गुणवत्तेचे विविध निकषांनुसार परीक्षण करण्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील शाळा तपासणी कमिटी महत्त्वाची भूमिका बजावते. शाळेतील शैक्षणिक वातावरण, पायाभूत सुविधा, शिक्षकांची गुणवत्ता, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, प्रशासन, शाळेच्या नोंदी तसेच CBSE च्या विविध नियमांचे पालन यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींचे परीक्षण या प्रक्रियेत केले जाते. अशा राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारीसाठी डॉ. अली सर यांची निवड होणे, ही त्यांच्या शैक्षणिक अनुभवाची, व्यावसायिक कार्यक्षमतेची आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाची महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे.

टाईम्स स्पेशल

श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज (CBSE), वेरळ ही संस्था विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक शैक्षणिक पद्धती, स्पर्धात्मक परीक्षांची तयारी, कौशल्यविकास आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.या निवडीमुळे कोकणातील शैक्षणिक संस्थांमधून राष्ट्रीय स्तरावर योगदान देण्याच्या संधींना निश्चितच प्रोत्साहन मिळेल. डॉ. अली यांच्या या उल्लेखनीय व गौरवशाली कामगिरीबद्दल संस्था अध्यक्ष सुयश पाष्टे, शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, सीईओ डॉ. विजय रॉबर्ट, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg