loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्गमध्ये श्री स्वामी समर्थ आरती मंडळ राय शिवोली गोवा यांच्या भजनाचे शानदार सादरीकरण

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ठिकाणी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम रेलचेल बघायला मिळत आहे. यातच मंगळवारी रात्री राय शिवोली गोवा येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप वर्णेकर यांच्या माध्यमातून दोडामार्ग पिंपळेश्वर सार्वजनिक गणपती ठिकाणी श्री स्वामी समर्थ आरती मंडळ राय शिवोली गोवा भजनी मंडळ यांचे भजन सादरीकरण करण्यात. या उत्तम सादरीकरणाने रसिक भजन प्रेमी भारावून गेले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग तालुक्यातील सार्वजनिक गणपती ठिकाणी दर्शनासाठी गर्दी वाढू लागली आहे तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक व भजन मंडळ यांच्या भजनाचे सादरीकरण यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ठिकाणी भाविकांची गर्दी दिसून येत आहे. मंगळवारी रात्री श्री स्वामी समर्थ आरती मंडळ राय शिवोली गोवा येथील भजनी कलाकार यांनी भजन सादरीकरण करताना अनेक अभंग तसेच श्री गणपती, श्री स्वामी समर्थ यांच्यावर आधारित गीत अभंग सादरीकरण केले. सर्व कलाकारांना रसिक प्रेक्षकांनी टाळया वाजवून दाद दिली. बुधवारी सकाळी दोडामार्ग सार्वजनिक गणपती ठिकाणी सत्यनारायण महापूजा, आरती तसेच महाप्रसाद पार पडला हजारो भाविकांनी महाप्रसाद लाभ घेतला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg