लांजा (संजय साळवी) - पोटासाठी देशाच्या सीमा ओलांडल्या, परदेशाची वाट धरली मात्र कोकणच्या मातीशी आणि आपल्या संस्कृतीशी असलेली नाळ आजही तितकीच घट्ट आहे. याचाच प्रत्यय भारतापासून हजारो मैल दूर असलेल्या ओमानमध्ये पाहायला मिळत असून गेल्या वीस वर्षांपासून तेथील मराठी तरुणांकडून पारंपरिक पद्धतीने ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत गणेशोत्सव साजरा केला जात आहे. ओमानमधील अल तसनीम सिमेंट प्रोडक्ट्स बॅचिंग प्लांट येथे ’श्री गणेश मित्रमंडळा’च्या माध्यमातून गणरायाची प्रतिष्ठापना करून उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. नोकरी - व्यवसायानिमित्त ओमानमध्ये वास्तव्यास असलेल्या कोकणातील तरुणांनी एकत्र येत ओमानच्या भूमीत वीस वर्षांची गणेशोत्सवाची अखंड परंपरा आजही जपली आहे.
या गणेशोत्सवातील देखावा विशेष आकर्षण ठरत असून तो देखावा ओमानमध्ये असलेल्या खेड सडेवाडी येथील चंद्रकांत चिनकटे यांच्या संकल्पनेतून आणि मेहनतीतून साकारण्यात येतो. परदेशातील उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून गणेशोत्सवाचा पारंपरिक बाज यावर्षीही जपण्याचा प्रयत्न यावेळीही या गणेशभकांकडून करण्यात आला आहे. या उत्सवाच्या आयोजनात कोकणातील विविध गावांशी नाते असलेले अनेक गणेशभक्त सहभागी होतात. यामध्ये नितीन गोरीवले (भिले, चिपळूण), संतोष घरवे (होडखाड, खेड), महादेव शिगवण (होडखाड, खेड), रोहित गजमल (चिपळूण), प्रकाश शिगवण (शिव, खेड), नयन मालप (अणसपूरे, खेड), मंगेश पानवलकर (अणसपुरे, खेड), चक्रवती (मुंबई), संदेश कांदेकर (तळघर, खेड) आणि लांजा शहरातील नामदेव नगर येथील चंद्रकांत कांबळे यांचा समावेश आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आरती, पूजा भजन तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परदेशात राहत असतानाही गणरायाच्या माध्यमातून एकत्र येत कोकणची संस्कृती आणि परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यानिमित्ताने मंडळाकडून केला जात आहे. दरम्यान, परदेशाच्या भूमीवरही गणेशोत्सव साजरा होत असल्याने ओमानमधील मराठी बांधवांना मायभूमीच्या उत्सवाची अनुभूती मिळत असल्याचे या गणेशभक्तांकडून सांगण्यात आले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.