loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी-आंबोली-चौकुळ-बेळगाव एसटी बस सुरू करायला टोलवाटोलवी, मनसेचे २ ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - चौकुळ, कुंभवडे, इसापूर, पारगड किल्ला तेरवण, भागातून बेळगाव येथे जाणारी एसटी बससेवा उपलब्ध नाही, यामुळे मोठी गैरसोय होते. यासाठी सावंतवाडी, आंबोली, चौकुळ, तेरवण, बेळगाव, एसटी बससेवा सुरू करावी, यासाठी गेल्या दिड वर्षापासून मागणी केली जात आहे. पण एसटी आगार सावंतवाडीकडून टोलवाटोलवी केली जात असल्याचे बोलले जात आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी दि. २ ऑक्टोबर रोजी सावंतवाडी आगार येथे धरणे आंदोलन करणार, असा इशारा मनसेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष दत्ताराम गावकर यांनी दिला आहे. कणकवली, विभाग नियंत्रण अधिकारी, सावंतवाडी आगार प्रमुख यांना दिलेल्या निवेदनात हा इशारा दिला आहे. निवेदन देऊन कार्यवाही होत नाही, यामुळे धरणे आंदोलन हा पर्याय आहे असे म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg