loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा तालुक्यात बिबट्याची दहशत; खेरवसे जाधववाडीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

केळंबे-लांजा दी.23स(सिराज नेवरेकर)लांजा तालुक्यातील खेरवसे जाधववाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त वावर सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. रात्रीच्या वेळी तसेच दीवसाही बिबट्याचे दर्शन झाल्याचे गावकऱ्यांतून बोलले जात आहे ,यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.या बिबट्याचा फोटोही ग्रामस्थांनी मोबाईलमध्ये कैद केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बिबट्याच्या सततच्या मुक्त संचारामुळे शेतावर कामाला जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तसेच, वस्त्यांमध्ये पाळीव प्राण्यांवर हल्ला होण्याची शक्यता निर्माण झाल्याने ग्रामस्थ रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. गावातील कुत्रे,मांजरांची या बिबट्याने फडशा पाडला असल्यामुळे या बिबट्याची अधिक भिती निर्माण झाली आहे.बिबट्यांचा नागरी वस्तीत वावर वाढल्यचे दिसून येत आहे.भक्ष्याच्या शोधासाठी बिबट्या फिरत असल्पामुळे पाळीव जनावरे रानात चरावयास सोडण्यात ग्रामस्थ घाबरत असल्याचे बोलले जात आहे'

टाइम्स स्पेशल

स्थानिक नागरिकांतून या संदर्भात बिबट्याचा बंदोबस्त करण्त्वयाची मागणी वनविभागाकडे केली जात आहे . तसेच वन विभागाने या भागात कॅमेरा ट्रॅप बसवून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि गावकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी तीव्र मागणी खेरवसे परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg