loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्रामसभामध्ये पोलिस अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांमध्ये गुन्ह्यांबाबत सजकता आणणार ,हा राज्यातील नव्हे तर देशातील पहिला उपक्रम : जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे

रत्नागिरी, ता. २३ : वाढते सायबर गुन्हे, अपघात, पोस्कोच्या केसेस, अमली पदार्थ गुन्हे ही चिंतेची बाब आहे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या ६५३ ग्रामसभामध्ये पोलिस अधिकारी आणि कर्मचारी जाऊन घडणाऱ्या या गुन्ह्यांबाबत प्रबोधन करणार आहेत. यातून नागरिकांमध्ये सजकता येऊन गुन्हे कमी होण्यास मदत होणार आहे. जिल्हा पोलिस दलाने राबविलेला हा राज्यातील नव्हे तर देशातील पहिला उपक्रम आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली. पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, गुन्हे शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्री. बगाटे म्हणाले, नागरिकांमध्ये पोलिस दलातर्फे वारंवार जनजागृती करूनही हे गुन्हे कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जनजागृती आवश्यक असल्याचे स्पष्ट होत आहे. याला पर्याय म्हणून आम्ही आता ग्राम सभांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. तिथे लोकांना बोलवण्याची गरज भासत नाही. मोठ्या प्रमाणात लोक गोळा होतात. तिथे वाढते सायबर गुन्हे, अपघात, पोस्कोच्या केसेस याबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन केले जाणार आहे. यासाठी आम्ही जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडुन जिल्ह्यातील ६५३ ग्रामसभांचे वेळापत्रक घेतले आहे. त्यानुसार प्रत्येत तालुक्यातील पोलिस अधिकारी, क्रर्मचारी या ग्रामसभांना जाऊन ग्रामस्थांमध्ये याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

टाइम्स स्पेशल

विशेष म्हणजे आपल्याकडे पोस्कोच्या केसेस मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. यामध्ये लांबचे कोणी नाही, तर जवळच्या नातेवाईकांकडुनच हे प्रकार घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सायबर गुन्ह्यांबाबत वारंवार प्रबोधन करून देखील नागरिकांची फसवणुक होत आहे. ही बाबत चिंतेची आहे. तसचे महामार्गावर अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. ते कमी करण्यासाठी काय करावे, याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे. राज्यात नव्हे तर देशात जिल्हा पोलिसांनी राबविलेला हा पहिला उपक्रम आहे. त्यामुळे या गुन्ह्यांना रोखण्यात आम्हाला नक्की यश येईल, असा विश्वास पोलिस अधीक्षक श्री. बगाटे यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg