रत्नागिरी - ‘मंगलमूर्ती प्रतिष्ठान’तर्फे यावर्षी घेण्यात आलेल्या ‘मंगलमूर्ती सजावट स्पर्धां’चा पारितोषिक वितरण सोहळा रवि. दि. २७ सप्टें. २०२६ रोजी सायं. ठिक ४ वा. मराठा भवन हॉल, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला सर्व पारितोषिक विजेत्यांनी तसेच गणेश भक्तांनी वाजत गाजत ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष करीत आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. ‘मंगलमूर्ती प्रतिष्ठान’च्या ‘मंगलमूर्ती स्पर्धा’ यावर्षीही सालाबाद प्रमाणे शिस्तबध्द व नियोजन बध्द पध्दतीने संपन्न झाल्या. सालाबाद प्रमाणे यावर्षीही घरगुती गणेशोत्सव, जिल्हास्तरीय सार्व. गणेशोत्सव व मंगलमूर्ती मिरवणूक स्पर्धा अशा ३ विभागात ही स्पर्धा घेण्यात आली. या तीनही विभागातील स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा रवि. दि. २७ सप्टें. २०२६ रोजी सायं. ठिक ४ वा. मराठा भवन हॉल, रत्नागिरी येथे संपन्न होईल. यावेळी सर्व पारितोषिक विजेत्यांना रोख पारितोषिके, आकर्षक सन्मानचिन्हे व सन्मानपत्रे देऊन गौरविण्यात येईल.
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत तसेच आ. किरण सामंत, रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे, जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदल, जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वैदेही रानडे, जिल्हा पोलिस अधिक्षक श्री. नितीन बगाटे, रत्नागिरीचे प्रांताधिकारी श्री. जीवन देसाई, स्वरुपानंद पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. दिपक पटवर्धन आदी मान्यवर अतिथी उपस्थित राहणार असल्याचे यावर्षीच्या स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष श्री. राजन शेट्ये यांनी माहिती देताना सांगितले. या पारितोषिक वितरण सोहळ्याची परिपूर्ण तयारी करण्यासाठी ‘मंगलमूर्ती प्रतिष्ठान’च्या कार्यकारी मंडळाची नुकतीच सभा संपन्न झाली. हा पारितोषिक वितरण सोहळा सालाबाद प्रमाणे यावर्षीही दिमाखदारपणे संपन्न होण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून सोहळ्याची परिपूर्ण तयारी करण्यात आली असल्याची माहिती श्री. दिपक राऊत, श्री. संदीप डोंगरे, श्री. विनायक हातखंबकर व श्री. उपेंद्र सुर्वे यांनी दिली.
‘मंगलमूर्ती प्रतिष्ठान’च्या या बैठकीला रत्नागिरीचे भूतपूर्व उपनगराध्यक्ष व संयोजन समितीचे अध्यक्ष श्री. राजन शेट्ये, श्री. दिपक राऊत, श्री. सुधाकरराव सावंत, श्री. प्रकाश शिंदे, श्री. सुनिल नलावडे, श्री. अविनाश सावंत, श्री. विजय सुर्वे, श्री. राजाराम सुर्वे, श्री. विनायक हातखंबकर, श्री. उपेंद्र सुर्वे, श्री. रमाकांत पांचाळ, अॅड. विनय आंबुलकर, श्री. निलेश लाड, डॉ. दिलीप पाखरे, श्री. दिपक देसाई, श्री. अशोक आंबवकर, श्री. विनायक चव्हाण, श्री. राजेंद्र नेरकर, ज्येष्ठ उद्योजक श्री. विजयशेठ ओसवाल, श्री. देवदत्त पेंडसे, श्री. संदीप डोंगरे, सौ. राजवर्धिनी घोसाळकर, श्री. विराज घोसाळकर, श्री. संजय वैशंपायन, श्री. संतोष रेडीज, श्री. नित्यानंद दळवी, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. उर्मिलाताई घोसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. या पारितोषिक वितरण सोहळ्याला सर्व पारितोषिक विजेत्यांनी तसेच गणेश भक्तांनी नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र मंडळी व स्नेहीजनांसह वाजत गाजत ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष करीत आवर्जुन उपस्थित रहावे व अथक परिश्रम घेऊन उत्कृष्ट गणेश देखावा सादर करणार्या भक्तांना व कलावंतांच्या कलेला दाद द्यावी असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष श्री. राजन शेट्ये यांनी ‘मंगलमूर्ती प्रतिष्ठान’च्या वतीने केले आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.