loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले यांचा स्थानिक महिलांसोबत फुगडीचा फेर; लोकपरंपरेचा आदर करत वाढवला गणेशोत्सवाचा आनंद!

​सावंतवाडी (प्रतिनिधी):गणेशोत्सव आणि गौरी-गणपतीचा सण म्हणजे संपूर्ण कोकणात भक्तिभाव, उत्साह आणि आनंदाचे उधाण! घराघरांतून मांगल्य आणि पारंपरिक संस्कृतीचा सुगंध दरवळत असताना, सावंतवाडीत या सणाचा एक अत्यंत सुंदर, आपुलकीचा आणि मन जिंकणारा प्रसंग पाहायला मिळाला. सावंतवाडी शहराच्या प्रथम नागरिक, लोकनियुक्त नगराध्यक्षा तथा सावंतवाडी संस्थानच्या सुनबाई सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी श्री गणेशाच्या दर्शनादरम्यान स्थानिक महिलांसोबत थेट फुगडीचा फेर धरून गणेशभक्तांचा आनंद द्विगुणित केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गौरी-गणपतीच्या काळात घरोघरी श्री गणेशाचे आगमन झालेले असताना, नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी शहरातील विविध भागांत जाऊन गणेश दर्शनाचा आस्वाद घेतला. सावंतवाडी संस्थानच्या सून आणि शहराच्या प्रथम नागरिक असूनही कोणतीही औपचारिकता न बाळगता, त्यांनी थेट जनतेच्या दारात जाऊन दर्शन घेण्याला प्राधान्य दिले. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमधील हे आपुलकीचे नाते आणि त्यांनी घातलेला हा नवा वस्तुपाठ अत्यंत कौतुकास्पद मानला जात आहे.​दर्शनादरम्यान एका घरात स्थानिक महिलांचा फुगडीचा खेळ रंगला होता. लोकसंस्कृती, परंपरा आणि सणाचा उत्साह पाहून सौ. श्रद्धाराजे भोसले स्वतःला रोखू शकल्या नाहीत. अतिशय सहजतेने आणि उत्साहाने त्याही या पारंपरिक खेळात सहभागी झाल्या आणि महिलांसोबत फुगडीचा फेर धरला.

टाइम्स स्पेशल

​आपल्या लाडक्या लोकप्रतिनिधीला आणि संस्थानच्या सूनबाईंना अशा प्रकारे आपल्यात मिसळून आनंदाने फुगडी खेळताना पाहून उपस्थित महिला व नागरिक भावुक आणि आनंदित झाले. अशा प्रसंगांमुळे लोकप्रतिनिधी आणि जनसामान्य यांच्यातील अंतर पुसले जाऊन सणाचा उत्साह द्विगुणित होतो. लोकपरंपरेचा आदर करत सर्वसामान्यांत मिसळून साजरा झालेला हा क्षण सावंतवाडीतील गणेशोत्सवाची एक सुंदर आठवण बनून राहिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg