loader
Breaking News
Breaking News
Foto

गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात विषुव दिनानिमित्त सूर्य निरीक्षण

रत्नागिरी (जमीर खलफे) : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला शाखेतील, खगोलशास्त्र विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने शरद संपात दिन (विषुवदिन) उत्साहात साजरा केला. या खगोलीय घटनेचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे खगोलशास्त्रातील बारकावे समजून घेतले. या उपक्रमासाठी पुणे येथील प्रा. उमेश चव्हाण हे विशेषत्वाने उपस्थित होते. प्रा. बाबासाहेब सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी शरद संपात दिनाचे महत्त्व विशद करणारी आकर्षक भित्तीपत्रके तयार केली होती. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी जमिनीवर सरळ काठी रोवून तिच्या सावलीच्या लांबीची अचूक नोंद घेतली. या सावलीच्या प्रयोगावरून मिळालेल्या निरीक्षणांच्या आधारे विद्यार्थ्यांनी गणिते करून रत्नागिरी शहराचे अक्षांश ९५ टक्क्यांपर्यंत अचूक मोजण्याचा यशस्वी प्रयोग केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी खास दुर्बिणीद्वारे सुरक्षितरीत्या सूर्यनिरीक्षण करण्यात आले, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी सूर्याच्या पृष्ठभागावरील सौर डाग प्रत्यक्ष पाहिले. या कार्यक्रमाला भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. भूषण ढाले आणि डॉ. विवेक भिडे, प्रा. निशा केळकर आदी मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मयुरेश तांबे व स्वरांगी म्हैसकर या विद्यार्थ्यानी विशेष मेहनत घेतली. पुस्तकी ज्ञानापलिकडे जाऊन विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या प्रत्यक्ष अनुभवजन्य आणि उपक्रमशील अभ्यासाचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर तसेच विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी विशेष कौतुक केले. शरद संपात दिवशी पृथ्वीचा कोणताही गोलार्ध सूर्याकडे झुकलेला नसतो. यामुळे सूर्य अचूक पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, ज्यामुळे दिवस व रात्र प्रत्येकी १२ तासांचे म्हणजेच समान असतात. या दिवशी सावलीच्या प्रयोगावरून कोणत्याही स्थानाचे अक्षांश सहजपणे काढता येतात, असे प्रा. बाबासाहेब सुतार यांनी स्पष्ट केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg