loader
Breaking News
Breaking News
Foto

गॅस सिलिंडरच्या डिलिव्हरीवरून वाद; चालकाला धक्काबुक्की, शिवीगाळ करून मोबाईल फोडला

संगमेश्वर (प्रतिनिधी) - कडवई येथील कोकण एचपी गॅस एजन्सीमध्ये सिलिंडरच्या डिलिव्हरीवरून झालेल्या वादात गॅस एजन्सीच्या चालकाला कॉलर पकडून धक्काबुक्की, शिवीगाळ करण्यात आली. तसेच त्याच्या हातातील मोबाईल खाली पाडून फोडल्याची घटना बुधवार, २३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा क्रमांक १९२/२०२६ नोंद करण्यात आला आहे. तक्रारदार भगवान प्रकाश लिंगायत (वय २४, रा. तुरळ, गुरववाडी, ता. संगमेश्वर) हे गॅस एजन्सीमध्ये चालक म्हणून काम करतात. तर असिम ईस्माईल मोडक (रा. कडवई, ता. संगमेश्वर) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांच्या नोंदीनुसार, संबंधित ग्राहक सिलिंडर बुक करूनही अद्याप डिलिव्हरी का झाली नाही, याची विचारणा करण्यासाठी गॅस एजन्सीत आले होते. यावेळी एजन्सीतील कर्मचार्‍यांनी घर बंद असल्याने सिलिंडर परत आल्याचे सांगितले. त्यानंतर चालक भगवान लिंगायत यांच्याशी सिलिंडर न दिल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादात आरोपीने तक्रारदाराची कॉलर पकडून त्यांना ढकलले तसेच शिवीगाळ केली. त्यानंतर तक्रारदाराच्या हातातील मोबाईल खाली पाडून तो फोडल्याने नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ११५(२), ३५२ व ३२४(२) अन्वये एनसीआर नोंद करण्यात आली असून पुढील तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार एस. एस. जाधव करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg