loader
Breaking News
Breaking News
Foto

कडवईच्या ‘वरदान देवी मंगळागौर संघा’चा डंका! सलग तीन स्पर्धेत प्रथम क्रमांक

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - पारंपरिक लोककलेचा वारसा जपत, घरप्रपंच आणि जबाबदाऱ्यांचा गाडा सांभाळून कडवईच्या रणरागिणींनी यशोशिखराला गवसणी घातली आहे. संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील ‘श्री वरदान देवी मंगळागौर संघाने’ आपल्या अप्रतिम सादरीकरणाच्या जोरावर सलग तीन मोठ्या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून एकहाती वर्चस्व सिद्ध केले आहे. ​लांजा तालुक्यातील भांबेड येथे ‘नवयुग उत्कर्ष मंडळा’तर्फे आयोजित चुरशीच्या मंगळागौर स्पर्धेत कडवईच्या संघाने अव्वल स्थान पटकावत विजयाची विजयी हॅट्ट्रिक साजरी केली. यापूर्वी संगमेश्वर तालुक्यात ‘शिवसेना (शिंदे गट) व राधागोविंद फाऊंडेशन’ तसेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)’ यांनी घेतलेल्या स्पर्धांमध्येही याच संघाने बाजी मारत प्रथम पारितोषिक नावावर केले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संघातील डॉ. अश्विनी नारकर, डॉ. प्रणाली ताठरे, आरती खाडे, रुचिरा रेडीज, मीना गोरीवले, रश्मी रहाटे, तुलसी कांबळे आणि रसिका गुरव यांनी पारंपरिक खेळ आणि नृत्याने रसिकांची मने जिंकली. त्यांना गायिका सुप्रिया कडवईकर, नम्रता यादव यांचे सुमधूर सूर आणि वादक प्रल्हाद मयेकर यांच्या लयबद्ध साथीने कार्यक्रमाची रंगत अधिक वाढवली. सांघिक यशासोबतच संघातील कलाकारांनी वैयक्तिक पातळीवरही छाप पाडली. तीनपैकी तब्बल दोन स्पर्धांमध्ये डॉ. अश्विनी नारकर यांनी, तर एका स्पर्धेत रसिका गुरव यांनी ‘बेस्ट सखी’ हा मानाचा किताब पटकावला.

टाईम्स स्पेशल

डॉ. अश्विनी नारकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संघाने ही झेप घेतली आहे. दैनंदिन कामांच्या व्यापातून वेळ काढून गावातील महिलांनी दाखवलेली ही एकजूट आणि कलेप्रतीची निष्ठा थक्क करणारी आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल अनुराधा नारकर यांच्यासह संपूर्ण पंचक्रोशीतून विजेत्या सख्यांवर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा अखंड वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg