loader
Breaking News
Breaking News
Foto

अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन शांततेत व उत्साहात पार पाडा! गणेश मंडळे, कार्यकर्ते व भाविकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांचे आवाहन

रसायनी(आनंद पवार) - रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा दिवस भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या गणेशोत्सवाची सांगता शुक्रवार(दि.२५)अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गणेशभक्तांनी गणेश विसर्जन मिरवणुका शांततापूर्ण, शिस्तबद्ध तसेच आनंदमय वातावरणात पार पाडाव्यात, असे आवाहन रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीड दिवसाच्या घरगुती गणपतींचे विसर्जन तसेच पाच दिवसांच्या गौरी-गणपतींचे विसर्जन उत्साहपूर्ण आणि शांततेच्या वातावरणात पार पडले.त्याच धर्तीवर आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी दहा दिवसांच्या गणरायांना भावपूर्ण निरोप देताना सर्वांनी कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवावे, असे भुजबळ यांनी सांगितले. गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान कोणाच्याही धार्मिक अथवा जातीय भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची प्रत्येक मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच गणेशभक्तांनी दक्षता घ्यावी. मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी सर्वांनी जबाबदारीने व संयमाने वागणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टाईम्स स्पेशल

विसर्जनाच्या ठिकाणी तसेच मिरवणूक मार्गावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्व मंडळांनी आणि भाविकांनी सहकार्य करावे. पोलिसांनी दिलेल्या सूचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करून गणरायाला आनंदमय, भक्तिमय आणि शांततापूर्ण वातावरणात निरोप द्यावा, अशी अपेक्षा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांनी व्यक्त केली. गणेशोत्सव हा आनंद, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचा सण आहे.त्यामुळे सर्वांनी उत्साह कायम ठेवत शांतता, शिस्त आणि सामाजिक सलोखा अबाधित राखावा, असे आवाहनही भुजबळ यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg