loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खासगी बस जळून खाक; १४ प्रवासी सुरक्षित

रसायनी (राकेश खराडे) - मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिसवाडी गावाजवळ गुरुवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. महामार्गाच्या पुणे लेनवर किलोमीटर क्रमांक १६.०० च्या दरम्यान ही घटना घडली. बसला अचानक आग लागल्यानंतर काही वेळातच आगीने संपूर्ण बसला वेढले आणि बस पूर्णपणे जळून खाक झाली. प्राथमिक माहितीनुसार, बसमध्ये एकूण १४ प्रवासी होते. आग लागल्याचे लक्षात येताच सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना दुसऱ्या बसमधून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनेची माहिती मिळताच पनवेल महानगरपालिका व खोपोली नगरपरिषद अग्निशमन दलाच्या पथकांसह रसायनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग विझवण्याचे काम हाती घेतले. सर्व यंत्रणांच्या तत्पर प्रयत्नांमुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली असली तरी सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला किंवा अन्य व्यक्तीला इजा झालेली नाही. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, रसायनी पोलीसांकडून पुढील तपास सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg