loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जपली १६ वर्षांची अथर्वशीर्ष पठणाची परंपरा

खेड - गणरायाच्या उत्सवाला संस्कार आणि भक्तीची जोड देत रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गेल्या १६ वर्षांपासून सुरू असलेली श्री गणपती अथर्वशीर्ष पठणाची अखंड परंपरा यंदाही कायम राखली. मंगळवार, दिनांक २२ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांनी खेडमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या श्री गणरायाच्या उत्सवात विद्यार्थ्यांनी केलेल्या सामूहिक अथर्वशीर्ष पठणाने गणेशोत्सव मंडपात भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले. अचूक शब्दोच्चार, लयबद्ध पठण तसेच आवाजातील चढ-उतार यामुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या भक्तिमय उपक्रमावेळी खेडच्या नगराध्यक्षा माधवीताई बुटाला व रोटरी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी पराग चिखले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध आणि सुस्पष्ट अथर्वशीर्ष पठण ऐकून त्यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. गेल्या सोळा वर्षांपासून रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून हा उपक्रम सातत्याने राबविला जात असून, भक्ती, संस्कार आणि भारतीय संस्कृतीची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणाऱ्या या उपक्रमाने एक सुंदर परंपरेचे रूप धारण केले आहे. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी केलेले सुस्पष्ट पठण उपस्थितांच्या विशेष कौतुकास पात्र ठरले.

टाईम्स स्पेशल

अथर्वशीर्ष पठणासाठी विद्यार्थ्यांनी दाखविलेली शिस्त, एकाग्रता आणि उत्स्फूर्त सहभाग पाहून उपस्थित गणेशभक्तांनी त्यांचे कौतुक केले. तसेच, ही संस्कारक्षम आणि भक्तिमय परंपरा भविष्यातही अखंडितपणे सुरू राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. या विशेष उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. या उपक्रमाबद्दल रोटरी स्कूलचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल तसेच सर्व शिक्षकांनी अथर्वशीर्ष पठण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg