loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमधील तिसे-सकपाळवाडी येथील नवतरुण मित्र मंडळाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश

खेड (प्रतिनिधी) - खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवतरुण मित्र मंडळाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश. ना. आदितीताई तटकरे (महिला व बालविकास मंत्री) व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत तिसे-सकपाळवाडी येथील नवतरुण मित्र मंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. तिसे-सकपाळवाडी येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर, पंचायत समिती सदस्या अपूर्वा जाधव, मनोज कदम आणि हर्षल जाधव प्रमुख उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व पदाधिकारी व सदस्यांचे स्वागत करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी अध्यक्ष: अनंत सकपाळ, सचिव: संतोष सकपाळ, खजिनदार: सदानंद सकपाळ, उपखजिनदार: रुपेश सकपाळ, सदस्य: गणेश सकपाळ, शैलेश सकपाळ, वसंत सकपाळ, दिलीप सकपाळ, विश्वनाथ सकपाळ, स्वप्नील सकपाळ, अजिंक्य सकपाळ, अभिजित सकपाळ, विजय सकपाळ, आयुष्य सकपाळ, सुशांत सकपाळ, लक्ष्मण सकपाळ, अक्षय सकपाळ, शुभम सकपाळ, सुनील सकपाळ, अनिकेत सकपाळ आणि देवजी सकपाळ यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg