loader
Breaking News
Breaking News
Foto

आश्वासनानंतरही पुरी तळण्याचा कारखाना सुरूच; २ ऑक्टोबरला दत्तात्रय मोरे यांचा आमरण उपोषणाचा इशारा

खेड (प्रतिनिधी) - भरणे ग्रामपंचायत हद्दीतील पुरी तळण्याचा कारखाना बंद करण्याबाबत प्रशासनाकडून आश्वासन मिळूनही संबंधित व्यवसाय अद्याप सुरू असल्याचा आरोप करत ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय सखाराम मोरे यांनी पुन्हा आंदोलनाची घोषणा केली आहे. न्यू श्रीराम समर्थ सोसायटी, भरणे येथे राहणारे दत्तात्रय मोरे यांनी संबंधित पुरी तळण्याच्या कारखान्यामुळे धूर, उग्र वास, उष्णता व इतर त्रास होत असल्याची तक्रार प्रशासनाकडे केली होती. मोरे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी भरणे ग्रामपंचायतपासून तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वारंवार पत्रव्यवहार केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेष म्हणजे, माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या ग्रामपंचायतीच्या लेखी उत्तरात संबंधित कारखान्यास ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नसल्याचे नमूद असल्याचे मोरे यांनी सांगितले. यापूर्वी प्रशासनाकडून कारवाईचे आश्वासन मिळाले होते. मात्र, आश्वासनानंतरही कारखाना सुरूच असल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे. त्यामुळे आता त्यांनी २ ऑक्टोबर २०२६, महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी पंचायत समिती, खेड कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे.

टाईम्स स्पेशल

मोरे यांचे वय ७६ वर्षे असून त्यांनी स्वतःवर हृदयाची शस्त्रक्रिया झाल्याचे सांगितले आहे. त्यांच्या पत्नीचेही वय ७० वर्षे आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा विचार करून प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आश्वासन नको, प्रत्यक्ष कारवाई हवी; संबंधित कारखान्याबाबत प्रशासनाने निर्णय घेऊन तो अमलात आणावा, अशी भूमिका मोरे यांनी मांडली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg