खेड (प्रतिनिधी) - मंडणगड तालुक्यात पत्नीचे फोटो काढल्याच्या संशयावरून दोन सख्ख्या भावांनी चुलत भावावर जीवघेणा हल्ला चढवत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कादवण येथे घडली आहे. आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत झालेली बेदम मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमकीमुळे प्रचंड मानसिक तणावाखाली गेलेल्या २७ वर्षीय तरुणाने दुसर्याच दिवशी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कादवण येथील रहिवासी सुरज संभाजी सोंडकर (वय २७) हे १८ सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास आई अनुसया, वडील व बहीणीसह घरात उपस्थित होते. त्यावेळी त्यांचे चुलत भाऊ मिलिंद सोंडकर (वय ३५) व मनोज सोंडकर (वय ४१) यांनी घरात अनाधिकार्याने प्रवेश केला. त्यांनी थेट सुरजच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत, तू माझ्या बायकोचे फोटो का काढलेस? तिच्याशी तुझे काय संबंध आहेत? असा जाब विचारत वाद घालण्यास सुरुवात केली.
वाद विकोपास गेल्यानंतर दोघांनी सुरजला लाकडी काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. कुटुंबीयांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना न जुमानता सुरजला रक्तबंबाळ करण्यात आले व जाताना जीवे मारण्याची उघड धमकी देण्यात आली. या गंभीर मारहाणीमुळे आणि धमकीच्या दहशतीमुळे सुरज प्रचंड मानसिक धक्क्यात होता. या भीतीपोटी त्याने १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात म्हशींसाठी वापरले जाणारे विषारी औषध प्राशन केले. कुटुंबीयांच्या ही बाब तात्काळ लक्षात आल्याने त्यांनी सुरजला तत्परतेने रुग्णालयात दाखल केले. वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी जखमी तरुणाची आई अनुसया संभाजी सोंडकर (वय ४५) यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली आहे. त्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी मिलिंद सोंडकर व मनोज सोंडकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(१) (धोकादायक हत्यारांनी दुखापत करणे), ३५२ (शांतता भंग करण्याच्या हेतूने अपमान करणे) आणि ३(५) (सामूहिक गुन्हेगारी कृत्य) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.