रत्नागिरी (टाइम्स डिजीटल डेस्क) - रत्नागिरी जिल्ह्यात गेले दोन दिवस सायंकाळनंतर पडणारा पाऊस भात व नाचणी पिकासाठी अत्यंत पूरक असल्याचे शेतकरीवर्गातून सांगितले जात आहे. जून महिन्यामध्येे लागवड झालेल्या भातपिकाला आता लोंबी आली आहे. त्यामुळे पाण्याची गरज भासत होती. दरम्यान गेले दोन दिवस वीजांच्या कडकडाटासह पडणारा पाऊस समाधानकारक असल्याचे म्हटले जात आहे. हलव्या भात शेतीला पावसाची गरज होती. अजून लोंबी फुटलेली नाही, अशा भातपिकाला पाऊस पडत असल्याने पूरक ठरणार आहे.
कोकणात कातळावरची भातशेती व नाचणी पिक पाऊस नसल्याने कोमेजून जाणार होतेच मात्र दोन दिवस पडलेल्या पावसाने कातळावर बर्यापैकी पाणी पडले आहे. त्याचा उपयोग शेतीला होणार आहे. जून महिन्यामध्ये आंबा आणि काजू झाडांना टाकलेल्या खतामुळे पाण्याची गरज होती. सध्या पडत असलेल्या पावसाने कोकणातील बागायतींमधील आंबा झाडांना नवी पालवी फुटल्याचे दिसून येतेय. त्यामुळे पावसाचा दीर्घ परिणाम आंबा पिकावर होईल, असे म्हटले जाते. कोकणात १५ ऑक्टोबरपर्यंत अधूनमधून पाऊस पडेल, हा पाऊस शेतीपूरक ठरेल, असे शेतकरीवर्गातून सांगितले जात आहे. सायंकाळी पडणार्या पावसामुळे शेतकरी आनंदीत झाला आहे. प्रतिवर्षी भात कापणीच्या वेळी सायंकाळी पडणारा पाऊस अजून भातपिक तयार झाले नसताना पडत असल्याने भातपिकाला धोका निर्माण होण्याची शक्यताही काही शेतकर्यांना वर्तविली आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.