loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात पीक संकटात: शेतकरी चिंताग्रस्त

सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातशेती हे प्रमुख पीक असले तरी यंदा हवामान बदलाचा आणि पावसाच्या अनियमिततेचा मोठा फटका भात पिकाला बसला आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात भात पीक परिपक्व होण्याच्या कालावधीत तफावत दिसून येत असून, सध्या कुठे कापणीचा उत्साह तर कुठे पाऊस गायब झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ​जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये भातपीक एकाच वेळी तयार होत नाही. समुद्रकिनारी असलेला भाग आणि सह्याद्रीच्या कुशीतील गावे यांच्या हवामानात फरक असल्याने पिकाचा कालावधी मागे-पुढे होतो. यंदा पावसाचे वेळापत्रक कोलमडल्याने आणि फुलोऱ्याच्या काळात पावसाने दांडी मारल्याने पिकाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्या देवगड परिसरात भात पिके परिपक्व झाल्याने शेतकऱ्यांनी कापणीच्या कामाला सुरुवात केली आहे. उद्योजक नंदकुमार घाटे यांच्या शेतातही योग्य नियोजन, वेळेवर केलेली कामे आणि मेहनतीमुळे यंदा भाताचे चांगले उत्पादन मिळाले असून तेथे कापणीची लगबग सुरू आहे. दुसरीकडे, सावंतवाडी सह जिल्ह्यातील अर्ध्या परिसरात भात पीक परिपक्व होण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर असतानाच पाऊस अचानक गायब झाल्याने शेतकरी वर्ग मोठा संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय कृषी हवामान शास्त्र विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (ग्रामीण कृषी मौसम सेवा, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे) यांच्या वतीने २३ ते २७ सप्टेंबर या कालावधीसाठी कृषी सल्ला जारी करण्यात आला आहे. ​जिल्ह्यात हलक्या व मध्यम मुदतीच्या भात पिकांमध्ये सध्या फुलोरा ते दाणे भरण्याची अत्यंत नाजूक अवस्था आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील उपाययोजना कराव्यात: ​मुसळधार पाऊस झाल्यास शेतात पाणी साचून न देता त्याचा तात्काळ निचरा करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

टाईम्स स्पेशल

त्यासाठी ​हलक्या भात पिकात पाण्याचा ताण बसू नये म्हणून शेतात २ ते ५ सें.मी. पाणी पातळी नियंत्रित ठेवावी.​ अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी व दाणे भरण्याची प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट (१३:००:४५) हे विद्राव्य खत १० ग्रॅम प्रति लिटर पाणी (१% प्रमाण) या दराने फवारणी करावी, असे आवाहन केले आहे. हवामानातील बदलांमुळे शेतीचे नियोजन आव्हानात्मक बनले असले तरी योग्य तंत्रज्ञान, वेळेवर दिलेला सल्ला आणि नियोजनबद्ध मेहनतीच्या जोरावर भातशेती टिकवून ठेवण्याचे प्रयत्न जिल्ह्यात सुरू आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले, मालवण व देवगड हे समुद्र किनारी भाग तर वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी व दोडामार्ग हे सह्याद्रीच्या जवळचे तालुके आहेत त्यामुळे पिक पाणी मध्ये बदल आढळून येत आहे, असे जाणकारांचे मत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg