loader
Breaking News
Breaking News
Foto

अरे वा! रविवारही सुरू राहणार सर्व बँका, चेक क्लिअरिंगपासून पैसे जमा करण्यापर्यंत सर्व कामे होणार

नवी दिल्ली: बँक कर्मचाऱ्यांच्या संपाच्या दरम्यान एक मोठी बातमी आली आहे. अर्थ मंत्रालयाने बुधवारी सांगितले की बँक कर्मचारी संघटनांचे संयुक्त व्यासपीठ 'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स' (UFBU) च्या प्रस्तावित संपाच्या (Bank strike) पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या सोयीसाठी रविवारी 27 सप्टेंबरला प्रादेशिक ग्रामीण बँकांसह सर्व बँका सुरू राहतील. UFBU ने 28 ते 30 सप्टेंबरपर्यंत तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये बँकांमध्ये (Bank) आठवड्यात पाच दिवसांचा कामकाज आठवडा लागू करण्याचा समावेश आहे. संघटनेचा दावा आहे की ती बँक क्षेत्रातील सुमारे 90 टक्के कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की 28 ते 30 सप्टेंबरपर्यंत प्रस्तावित तीन दिवसांचा संप आणि त्यापूर्वी 26 आणि 27 सप्टेंबरला शनिवार व रविवारच्या सुट्ट्या (Bank Holiday) लक्षात घेता सरकारने ग्राहकांना बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलली आहेत. निवेदनात म्हटले गेले आहे, "जनतेच्या बँकेच्या गरजा दीर्घकाळासाठी प्रभावित होऊ नयेत, हे सुनिश्चित करण्यासाठी सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका 27 सप्टेंबर 2026 रोजी रविवारी सामान्यपणे काम करतील. भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँक शाखा, कार्यालये, एटीएमशी जोडलेल्या शाखा आणि 'करन्सी चेस्ट' 27 सप्टेंबरला पूर्णपणे कार्यरत ठेवण्यास मंजुरी दिली आहे. अर्थ मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या वित्तीय सेवा विभागाने सांगितले की बँक ग्राहकांची सोय आणि कल्याण ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सरकार आणि बँक व्यवस्थापनाने बँक कर्मचारी संघटनांना प्रस्तावित संप पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे. तसेच आवश्यक बँकिंग सेवा विनाअडथळा सुरू राहण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg