loader
Breaking News
Breaking News
Foto

खेर्डीत तालुकास्तरीय शालेय व खुली बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

चिपळूण : ‘खेर्डीचा राजा’ विठ्ठलावाडी गणेश मित्रमंडळ, खेर्डी-चिपळूण यांच्या वतीने स्व. सौ. नेहा अजित दाभोळकर यांच्या स्मरणार्थ चिपळूण तालुकास्तरीय शालेय व खुली बुद्धिबळ स्पर्धा २०२६ चे आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेत जवळपास ८५ स्पर्धाकांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा रविवार, २० सप्टेंबर रोजी खेर्डी-विठ्ठलवाडी येथे पार पडली. खेर्डीत पहिल्यांदा अशी बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उदघाट्न प्रसिद्ध उद्योजक अनिलशेठ दाभोळकर, डॉ अजित दाभोळकर, जिल्हा बँकेच्या संचालिका दिशाताई दाभोळकर, मंडळाचे आधारस्तंभ दशरथ शेठ दाभोळकर, खेर्डीचे माजी उपसरपंच अभिजीत खताते, डॉ रजत दाभोळकर, डॉ श्रुती दाभोळकर, राकेश दाभोळकर, रियाज खेरडकर, प्रणाली दाभोळकर, आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर स्पर्धा इयत्ता पहिली ते सातवी, आठवी ते दहावी आणि खुला अशा तीन गटात घेणायात आल्या होत्या आहे. या स्पर्धेत पहिली ते सातवी या गटात प्रथम क्रमांक मार्मिक मांडके, द्वितीय क्रमांक निलेश भाटी, तृतीय क्रमांक वेदांत शिंदे, चतुर्थ क्रमांक श्रीराज चांदे, आणि पाचवा क्रमांक अर्णव कांबळे, आठवी ते दहावी या गटात प्रथम क्रमांक श्लोक घाग, द्वितीय क्रमांक विपिन सावंत, तृतीय क्रमांक सोहम अभ्यंकर,चतुर्थ क्रमांक अनुष्का विश्वकर्मा,पाचवा क्रमांक आदित्य कांबळे, खुला गट प्रथम क्रमांक साहस नारकर द्वितीय क्रमांक प्रवीण सावर्डेकर तृतीय क्रमांक ओम चव्हाण,चतुर्थ क्रमांक वैभव गुरव,पाचवा क्रमांक खुशी विश्वकर्मा सर्व विजेत्या स्पर्धाकांना रोख पारितोषिक सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच या स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिक देखील होते. त्यामध्ये सर्वात लहान खेळाडू मुलगी जुई देवळेकर, सर्वात लहान खेळाडू मुलगा शर्विल वरवाटकर, सर्वात ज्येष्ठ खेळाडू पुरुष गिरीश करमरकर, सर्वात ज्येष्ठ खेळाडू महिला स्वरदा खोत यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेचे बक्षीस वितरण सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध शेखर निकम, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, डॉ.रजत दाभोळकर आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. अशी स्पर्धा दरवर्षी व्हावी कारण स्पर्धा नियोजन खूप छान झाली होती म्हणून परत अशी स्पर्धा व्हावी अशी पालकांची देखील मागणी केली आहे.

टाईम्स स्पेशल

ही स्पर्धा खेर्डीतील सुप्रसिद्ध डेंटिस्ट डॉ. रजत दाभोळकर यांनी त्यांच्या आई स्व. सौ नेहा अजित दाभोळकर यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत केली होती. या स्पर्धेसाठी तांत्रिक सहकार्य प्रविण सावर्डेकर व रश्मी प्रविण सावर्डेकर, प्रतिरंग चेस ॲकॅडमी, मार्कंडी- चिपळूण. तसेच स्पर्धा पंच श्रीहास नारकर व साहस नारकर यांनी काम पहिले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे आधारस्तंभ अशी जशी दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष शशांक भिंगारे, खजिनदार बाळू कदम, प्रशांत दाभोळकर, राकेश दाभोळकर, विकास ढवन, अजित वाडकर, रियाज खेरडकर, जयंत वाडकर, जयेश वाडकर, सुमित पवार, निखिल वाडकर, हर्ष वाडकर, अमेध दाभोळकर, हनुमान भोयर, आर्चीता दाभोळकर, सुशांत पवार, अथर्व पवार, हर्षल भोसले, संस्कार वाजे अदि सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली व स्पर्धा पार पडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg