वैभववाडी (प्रतिनिधी) - विद्यार्थ्यांनी केवळ गुण मिळविण्यापुरते मर्यादित न राहता आपल्या कर्तृत्वातून समाजाचे आणि कुटुंबाचे नाव उज्ज्वल करावे. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, यासाठी समाजाने एकत्रितपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वैभववाडी तालुका भाजपचे सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत गुरव यांनी केले. गुरव ज्ञाती समाज सामाजिक संस्था, गुरववाडी-हेत यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अनंत वाळवडकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी वैभववाडीचे माजी सभापती तथा गुरव ज्ञाती बांधव समाजाचे प्रदेश सरचिटणीस मंगेश गुरव, तालुकाध्यक्ष गुरुनाथ गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संजय सावंत गुरव व मंगेश गुरव यांनी विद्यार्थ्यांसह समाजबांधवांना मार्गदर्शन केले. सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. स्नेहा अशोक गुरव हिने दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. तिने डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. तिच्या पुढील शिक्षणासाठी संस्थेच्या वतीने १० हजार १ रुपयांची आर्थिक मदत संजय सावंत गुरव यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी स्नेहाच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी संजय सावंत गुरव यांनी ५ हजार रुपये, मंगेश गुरव यांनी ५ हजार रुपये, तर गुरुनाथ गुरव यांनी २ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत केली.
कार्यक्रमाला संस्थेचे मुंबई अध्यक्ष अनंत वाळवडकर, सचिव संजय गुरव, खजिनदार सुभाष गुरव, तसेच गावच्या संस्थेचे अध्यक्ष सचिन गुरव, सचिव प्रकाश डोंगरकर, खजिनदार बाळकृष्ण वाळवडकर, उपाध्यक्ष चंद्रकांत गुरव, आकाराम गुरव, मुंबई विवाह प्रमुख गुरव ज्ञाती समाज मुंबईचे सुरेश राणे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. गुरव समाजातील समाजबांधव, भगिनी तसेच शाळकरी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन संजय गुरव यांनी केले. सूत्रसंचालन संजय मनोहर राणे (गुरव) आणि प्रशांत प्रकाश डोंगरकर यांनी केले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.