loader
Breaking News
Breaking News
Foto

विद्यांजली पोर्टलच्या माध्यमातून आंबवली शाळेला मदतीचा हात; डॉ. राहुल आंधळे यांच्याकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप

मंडणगड (प्रतिनिधी) : शासनाच्या ‘विद्यांजली पोर्टल’च्या माध्यमातून समाजातील दानशूर व्यक्ती आणि शाळा यांच्यातील दुवा अधिक मजबूत होत असल्याचे चित्र समोर आले आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आंबवली (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) यांनी पोर्टलवर नोंदविलेल्या मागणीला प्रतिसाद देत, दापोली तालुक्यातील आरोग्य अधिकारी डॉ. राहुल आंधळे यांनी शाळेला आवश्यक शैक्षणिक साहित्याची मदत केली. शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या ‘विद्यांजली’ या डिजिटल व्यासपीठामुळे सरकारी शाळांच्या गरजा थेट समाजातील इच्छुक व्यक्ती, संस्था व दानशूरांपर्यंत पोहोचतात. लोकसहभागातून सरकारी शाळा सक्षम करणे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात समाजाचा थेट सहभाग वाढवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून समाजसेवेची प्रत्यक्ष संधी मिळत असून आंबवली शाळेने नोंदविलेली गरज डॉ. आंधळे यांनी पूर्ण केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उटंबर येथील समुदाय आरोग्य अधिकारी (प्राथमिक आरोग्य केंद्र केळशी, ता. दापोली) डॉ. राहुल आंधळे यांनी स्वतः पुढाकार घेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपयोगाचे साहित्य शाळेस भेट दिले. या साहित्यामुळे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अध्ययनाला गती मिळणार आहे. या शैक्षणिक व समाजोपयोगी कार्यात विद्यांजली सारख्या व्यासपीठाच्या माध्यमातून शाळांच्या गरजांची पूर्तता करण्याचे आवाहन डॉ. आंधळे यांनी यावेळी उपस्थितांना केले. केवळ मदत स्वीकारून न थांबता, निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना वृक्षारोपणासाठी एक रोपटे भेट देऊन त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला व निरोप दिला. या पर्यावरणपूरक परतफेडीचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाप्रसंगी चिंचघर केंद्राचे केंद्रप्रमुख पाडलेकर, शाळेचे मुख्याध्यापक सचिन नाकोडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदेश धाडवे, उपाध्यक्षा संचिता वडतकर, पदवीधर शिक्षक गजानन गोरे, बळीराम तांदळे, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यांजली पोर्टलच्या प्रभावी उपयोगाबद्दल तसेच डॉ.राहुल आंधळे यांच्या सामाजिक बांधिलकीबद्दल शाळा व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg