loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्रामपंचायत कुणकवण येथे जल अर्पण महोत्सव उत्साहात

देवगड (प्रतिनिधी) - जलसंवर्धन, पाणी बचत व गुणवत्तेबाबत जनजागृती जल जीवन मिशन अंतर्गत कुणकवण येथे जल अर्पण महोत्सव उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जलसंवर्धन, पाणी बचत, पाणी गुणवत्तेसह जल जीवन मिशनच्या उद्दिष्टांबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. “जल जीवन मिशनच्या माध्यमातून गावातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच ग्रामपंचायत, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, स्वयंसहाय्यता गट तसेच ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.”

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा कार्यक्रम कुणकवण सरपंच वैशाली पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपसरपंच आनंद ठाकुरदेसाई, शाखा अभियंता संदीप पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी निलेश पाताडे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश गुरव, सुषमा जनक, रुपाली पाटणकर, मिनाक्षी गोरूले, माऊली चव्हाण महाराज, अंगणवाडी सेविका, गटसमन्वयक वैशाली मेस्त्री, पाणी समन्वयक हर्षदा बोथीकर, विद्यार्थी, बचतगट प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जल अर्पण महोत्सवानिमित्त गावातून जलदिंडी काढण्यात आली.

टाईम्स स्पेशल

यावेळी पाणी बचत, जलसंवर्धन आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच जल बंधन, पाणी गुणवत्ते बाबत मार्गदर्शन आणि जलसंकल्प शपथ असे विविध उपक्रम राबविण्यात आले. ग्रामस्थांना शुद्ध व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच गावातील जलस्रोतांचे संवर्धन व संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रस्तावणा व सुत्रसंचलन विनायक धुरी तर आभार ग्रामपंचायत अधिकारी निलेश पाताडे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg