loader
Breaking News
Breaking News
Foto

विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्या गणपती आरास स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

देवगड (प्रतिनिधी) - गणेशोत्सव २०२६ चे औचित्य साधून विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्या वतीने विजयदुर्ग, रामेश्वर आणि गिर्ये या तीन गावांसाठी घरगुती गणपती सजावट व आरास ऑनलाइन फोटो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत सहभागी झालेल्या घरांना मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी प्रत्यक्ष भेट देत गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. तसेच स्पर्धेतील विजेत्यांना श्रीफळ व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचेही मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या स्पर्धेत प्रतीक प्रविण जोशी, विष्णू सरवणकर, दीपक (राजू) मिठबावकर व परिवार, यश राजम, दुर्गादास सारंग, वाडये बंधू, मयुरेश मोंडकर, सकपाळ बंधू व परिवार, किरण शिवाजी केळकर, तन्मय राजेंद्र दांडेकर, ऋषिकेश माळगावकर (बांदेवाडी), सिद्धार्थ संतोष दुदवडकर (कोठारवाडी) आणि सचिन घारकर (घरीवाडी) यांची विजेते म्हणून निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामस्थांनी आपल्या कल्पकतेला वाव देत विविध विषयांवर आधारित आकर्षक सजावट व आरास साकारल्या. यामध्ये किल्ले संवर्धन, पर्यावरणपूरक संदेश, आरोग्यविषयक जनजागृती, वृक्षारोपण, कासवांचे संवर्धन, प्राचीन संस्कृती, पाषाण मंदिरे, नारळाच्या झाडापासून तयार केलेली सजावट, अष्टविनायक, स्वामी समर्थ दर्शन, भगवान श्रीकृष्णाने एका बोटावर उचललेला गोवर्धन पर्वत तसेच विविध निसर्गरम्य देखावे साकारण्यात आले होते. गणपती बाप्पासमोरील आकर्षक फुलांची आरास, तरुण पिढीने साकारलेल्या नाविन्यपूर्ण सजावटी आणि त्यातून देण्यात आलेले सामाजिक व जनजागृतीपर संदेश विशेष लक्षवेधी ठरले. या स्पर्धेच्या माध्यमातून धार्मिक उत्सवासोबतच सामाजिक, पर्यावरणीय आणि सांस्कृतिक विषयांबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

स्पर्धेचे शिस्तबद्ध व यशस्वी आयोजन केल्याबद्दल विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. या पारितोषिक वितरण व सत्कार सोहळ्यास मंडळाचे मुंबई अध्यक्ष नितीन जावकर, गाव अध्यक्ष चंद्रकांत बिडये, मुख्य सल्लागार राजेंद्र परुळेकर, सचिव योगिता परुळेकर, मार्गदर्शक विश्वनाथ गडकर व वसंतभाई दळवी यांच्यासह मंडळाचे सदस्य व सदस्या विद्या गवाणकर, प्रमोद बिडये, श्रीधर दळवी, रविकांत राणे, आनंद गिरकर, आदित्य बिडये, सुधीर म्हस्कर, शीतल दळवी, स्वेता म्हस्कर, युक्ता म्हस्कर आणि उल्का गिरकर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg