loader
Breaking News
Breaking News
Foto

वणौशीतर्फे पंचनदी ग्रामसभेत सर्वानुमते भिवबंदर येथे प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला विरोधाचा ठराव पारीत

दापोली (प्रतिनिधी) : वणौशी तर्फे पंचनदी ग्राम पंचायतीची काही विशेष विषयासंदर्भात वणौशी गुरववाडी येथील जिल्हा परिषद शाळेत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष ग्रामसभेत भिवबंदर येथे होणार्‍या प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भात विषय चर्चेला आला असता ग्रामस्थांनी सर्वानुमते अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शविला. तसेच या विषयी कोणत्याही प्रकारचा नाहरकत दाखला देण्याचे झाल्यास ग्रामस्थांना विश्वासात घेतल्या शिवाय नाहरकत दाखला देण्यात येऊ नये, अशाप्रकारचा सर्वोनुमते एकमताने ग्रामसभेचा ठराव पारित करण्यात आला. वणौशीतर्फे पंचनदी ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेचे आयोजन वणौशी गुरववाडी येथील जिल्हा परिषद शाळेत बुधवारी २३ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पंचनदी ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि प्रतिष्ठित नागरिक अशोक जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या ग्रामसभेत सर्वप्रथम सायबर गुन्हे संदर्भात दाभोळ सागरी पोलिस ठाण्याचे एपीआय अमोल गोरे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर शैक्षणिक विषया संदर्भात ग्राम सभेत चर्चा करण्यात आली विशेष ग्राम सभेच्या विषय पटलावरील ठरलेल्या विषयांची चर्चा झाल्यानंतर ग्रामस्थांच्या निवेदनावर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने वणौशी तर्फे पंचनदी गावाच्या भिवबंदर येथे प्रस्तावित असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भात ग्रामस्थांच्या मागणीनुसार विषय घेण्यात आला असता ग्रामपंचायतीकडे कोणतीही अधिकृत माहिती व याबाबतचा अर्ज अथवा ग्रामपंचायतचे कोणत्याही प्रकारची परवानगी वा नाहरकत दाखले अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भात कोणालाही देण्यात आलेले नसल्याचे ग्रामअधिकारी अनंत कोळी यांनी स्पष्ट केले.

टाईम्स स्पेशल

त्यानंतर या संदर्भात ग्रामस्थांनी चर्चा केली. या चर्चेमध्ये संजय दळवी, संतोष गुटेकर, दीपक घडसे, प्रभाकर बुरबांडकर, संतोष बोरकर आदी अनेकांनी चर्चा घडवून आणत या प्रकल्पाला आपला ठाम विरोध दर्शविला. त्याला ग्रामसभेनेही आपल्या हद्दीत हा अणुऊर्जा प्रकल्प नकोच म्हणून विरोधात सुरु मिसळून कडाडून अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध केला. अखेर सर्वानुमते अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात ठराव पारीत करण्यात आला. तसेच ग्राम पंचयतीने कोणत्याही प्रकारचा नाहरकत दाखला, वा मंजुरीचा ठराव ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय देण्यात येऊ नये, असे ठरविण्यात आले. त्यामुळे आता बहुचर्चित अणुऊर्जा प्रकल्पाला ग्रामसभेचासुद्धा ठाम विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg