मालवण (प्रतिनिधी) - मालवण शहरातील अस्वच्छता आणि स्वच्छतेच्या प्रश्नाकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असून शहरात डेंग्यूचे रुग्णही वाढू लागले असताना या गंभीर परिस्थितीची दखल घेत आज ठाकरे शिवसेना पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते महेंद्र म्हाडगूत यांच्या नेतृत्वाखाली शहरात प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. यावेळी प्रशासनातील स्वच्छता निरीक्षक संजय पवार व संबंधित कर्मचार्यांना प्रत्यक्ष ठिकाणी नेऊन अस्वच्छतेचे वास्तव दाखवून देत शहरातील स्वच्छतेबाबत निष्काळजीपणा खपवून घेणार नाही असा इशारा ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवकांनी दिला. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून प्रशासनाला स्वच्छतेबाबत वारंवार आवाहन करूनही परिस्थिती सुधारलेली नाही. शहरात ठिकठिकाणी साचलेले पाणी, तुंबलेली गटारे, कचर्याचे साम्राज्य आणि त्यामुळे वाढलेला डासांचा प्रादुर्भाव यांमुळे मालवणवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी आणि प्रत्यक्ष परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठीच हा दौरा काढण्यात आल्याचे ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी स्पष्ट केले.
गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून प्रशासनाकडून शहरातील सुमारे साडेआठ हजार घरांचा कचरा दररोज उचलला जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत वेगळीच वस्तुस्थिती समोर आली आहे. अनेक भागांत कचरा वेळेत उचलला जात नसल्याचे दिसून आले. त्यामुळे स्वच्छता ठेकेदाराच्या कामकाजावर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष ठेवून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. स्वच्छतेचा प्रश्न केवळ कचरा उचलण्यापुरता मर्यादित नसून प्रशासनाने शौचालयांच्या गॅस पाईपवर डास रोखण्यासाठी जाळी बसवणे, शौचालयातील ओव्हरफ्लो होणार्या सांडपाण्याचा योग्य निचरा करणे, प्रत्येक गृहसंकुलाने आपल्या आवारात आवश्यक फिल्टरेशनची व्यवस्था करणे या बाबींवर तातडीने जनजागृती आणि उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नगरसेवकांनी नमूद केले. डेंग्यूचा रुग्ण आढळल्यानंतरच फॉगिंग मशीन सुरू करण्यात आली. त्यापूर्वी नियमित फॉगिंग का केले नाही? प्रशासनाने यावर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. वेळेत पावले उचलली असती तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती असे तपस्वी मयेकर यांनी सांगितले.
आपल्या परिसरात कचरा उचलला जात नसेल, गटारे तुंबली असतील किंवा सांडपाणी साचले असेल, तर नागरिकांनी गप्प न बसता तातडीने छायाचित्र काढून नगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांकडे किंवा लोकप्रतिनिधींकडे पाठवावे आणि त्वरित कारवाई करून घ्यावी, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. आज डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असून वेळीच उपाययोजना न झाल्यास मलेरिया आणि टायफॉईडसारख्या साथीच्या आजारांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मालवण नगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ न करता तातडीने आणि गांभीर्याने पावले उचलावीत, अन्यथा यापुढे निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.