loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळा शहरात भरवस्तीत रानमांजराचा तरुणीवर हल्ला; भीतीचे वातावरण

म्हसळा (प्रतिनिधी) : म्हसळा शहरातील भरवस्तीत रानमांजराने तरुणीवर हल्ला केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हल्ल्‌यात जखमी झालेली तरुणी पोतदार हॉस्पिटलमध्ये कामाला असल्याची माहिती मिळाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेष म्हणजे, ज्या परिसरात ही घटना घडली त्या ठिकाणी शाळा असून विद्यार्थ्यांचीही मोठी वर्दळ असते. त्यामुळे वन्यप्राण्याचा वावर शाळा परिसरातही होण्याची शक्यता असल्याने पालक व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भरवस्तीत रानमांजराचा वावर आणि तरुणीवर झालेला हल्ला यामुळे वनविभागाने तातडीने परिसराची पाहणी करून संबंधित वन्यप्राण्याचा शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शाळेत ये-जा करणार्‍या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीही आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी आणि संशयास्पद वन्यप्राणी आढळल्यास त्याच्या जवळ न जाता तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg