रत्नागिरी (प्रतिनिधी) - फिशमिल कंपन्यांच्या मनमानीमुळे जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांचे अतोनात आर्थिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास येताच रत्नागिरी सिंधुदुर्गचे खा. नारायण राणे यांनी गंभीर दखल घेऊन तातडीने संबंधितांची बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले असल्याचे भाजपाचे अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अब्दुल बिजली खान यांनी माहिती देताना सांगितले. काही फिशमिल कंपन्या मनमानी करुन छोट्या मासळीला कमी दर देत असल्याने मच्छिमार बांधवांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. ही बाब ध्यानी येताच खा. नारायण राणे यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली व तातडीने संबंधितांची बैठक आयोजित करण्याबाबत निर्देश दिले. या बैठकीला स्वत: खा. नारायण राणे, राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री ना. नितेश राणे, भाजपा अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अब्दुल बिजली खान, फिशमिल कंपन्यांचे मालक व मच्छिमार बांधव यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचे अब्दुल बिजली खान यांनी सांगितले.
मच्छिमारांना चांगला दर मिळून देणारी मच्छि अद्यापही मिळण्यास सुरुवात झालेली नाही, केवळ फिशमिलला उपयोगी अशी छोटी मासळी काही प्रमाणात मिळते. त्यावर मच्छिमारांना सर्व खर्च भागवावे लागतात व उपजीविका करावी लागते. अशातच या छोट्या मासळीला दर कमी देण्यात आला तर मग जगावे कसे? असा मोठा बिकट प्रश्न मच्छिमारांसमोर उभा राहतो. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात एक टब छोट्या मासळीचा दर १८०० होता तो आता कमी करुन फिशमिल कंपन्या फक्त रु. ११०० इतका देत असल्याचे अब्दुल बिजली खान यांनी सांगितले. फिश मिल कंपन्यांच्या मनमानीमुळे मच्छिमारांचे अतोनात नुकसान होत असल्याचे अब्दुल बिजली खान यांनी खा. नारायण राणे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी खा. नारायण राणे व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेवून कंपन्यांच्या मनमानीची माहिती दिली व त्यानुसार खा. नारायण राणे यांनी त्वरेने संबंधितांची बैठक घेण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती अब्दुल बिजली खान यांनी दिली.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.