loader
Breaking News
Breaking News
Foto

‘हॉटेल भाग्यवान’चे खेडमध्ये उद्घाटन

खेड, (प्रतिनिधी) : खेड शहरातील नाना-नानी पार्कजवळ दत्ता तनपुरे यांच्या नवीन ‘हॉटेल भाग्यवान’चा शुभारंभ भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि नगराध्यक्षा माधवी राजेश बुटाला यांच्या हस्ते करण्यात आला. या उद्घाटन सोहळ्याला भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, नांदगाव ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश पालकर, भाजपा खेड उपशहराध्यक्ष प्रणव मापुस्कर यांच्यासह भारती तनपुरे, अश्विनी वडके, मनोज दांडेकर, जयेश गुहागरकर, केदार वणजू, प्रदीप भोसले, ओवैस चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उपस्थित मान्यवरांनी दत्ता तनपुरे व त्यांच्या कुटुंबीयांना नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या. शहरातील नागरिक तसेच खेडमध्ये येणार्‍या पर्यटक आणि प्रवाशांसाठी ‘हॉटेल भाग्यवान’ हे नवीन पर्याय उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उद्घाटन सोहळ्यास तनपुरे कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg