loader
Breaking News
Breaking News
Foto

पीएम सूर्य घर योजना व स्मार्ट सोलर योजनेचा ग्राहकांनी लाभ घेण्याचे महावितरण कडून आवाहन

वरवेली (प्रतिनिधी) - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक व घटनात्मक पदावरील कार्यकाळास २५ वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून वीज ग्राहकांना अधिक वेगवान आणि सुलभ सेवा देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात महावितरण कडून विशेष सेवा कक्ष उभारण्यात आला असून १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर पर्यंत सेवा सेतू आणि सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून गुहागर मध्ये शृंगारतळी येथे महावितरणकडून या संकल्प अभियानामधील पीएम सूर्य घर योजना व स्मार्ट सोलर योजना या योजनेची ग्राहकांना माहिती देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या योजनेमध्ये महिना १०० युनिट पेक्षा कमी असलेल्या ग्राहकांसाठी स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासिय रूफटॉप (स्मार्ट) सोलर योजना ही आहे आणि १०० युनिट वरील ग्राहकांसाठी प्रधानमंत्री सूर्य घर मोफत योजना आहे. या अभियानासाठी उपकार्यकारी अभियंता सुनील सूद, तळवळीचे कनिष्ठ अभियंता ऑल्विन फर्नांडिस, गुहागरचे सहाय्यक अभियंता ऋषिकेश शेट्ये, शृंगारतळीचे सहाय्यक अभियंता बापू सोनवणे, गुहागरच्या सहाय्यक अभियंता सौ.काजल नायक,आबलोलीचे कनिष्ठ अभियंता सुजय निकम, गुहागरचे उच्चस्तरीय लिपिक महेश डिंगणकर व सर्व महावितरणचे कर्मचारी गावोगावी विशेष मेहनत घेत असून ग्राहकांपर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg