loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंढे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन

चिपळूण (संतोष पिलके) : चिपळूण तालुक्यातील सुसज्ज आणि नावलौकिक प्राप्त ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या मुंढे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. ग्रामपंचायतीने उभारलेल्या या वास्तूचे आमदार शेखर निकम यांनी विशेष कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी बोलताना आमदार शेखर निकम म्हणाले की, मुंढे ग्रामपंचायतीची ही इमारत पाहून मनापासून आनंद झाला. आपल्या घरासारखी सुंदर आणि सुसज्ज इमारत उभारण्याचे काम ग्रामपंचायतीने केले आहे. या इमारतीमुळे ग्रामस्थांना एक चांगली सुविधा उपलब्ध झाली असून, भविष्यात या ठिकाणी विविध शासकीय शिबिरे, उपक्रम आणि लोकाभिमुख कार्यक्रम आयोजित करता येतील. या इमारतीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल जाधव कुटुंबीयांचे त्यांनी मनापासून आभार मानले. सूर्यकांत खेतले सभापती पंचायत समिती, दादासाहेब साळवी, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, सौ. उमा पाटील गट विकास अधिकारी, मयूर खेतले, शाम खेतले, सखाराम गायकवाड, श्रीपाद खेतले, तंटामुक्ती अध्यक्ष मुंडे, प्रकाश आरवट, अमोल मस् अभियंता शिरगाव, सिताराम खेतले, शिवाजी खेतले, रवींद्र खेतले, शैलेश चव्हाण, विजय मोहिते, अनिल शिंदे, प्रवीण सावंत,प्रवीण सावंत, रुपेश खेतले, प्रशांत महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg