loader
Breaking News
Breaking News
Foto

भातशेती तयार होण्याच्या मार्गावर; मुसळधार पावसाच्या शक्यतेने, शेतकर्‍यांची धाकधूक

संगमेश्वर (सत्यवान विचारे) : संगमेश्वर तालुक्यात यंदाची भातशेती आता कापणीच्या उंबरठ्यावर पोहोचली असून अनेक ठिकाणी भाताचे पीक तयार होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, आगामी काळात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात असल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडली आहे. तयार झालेल्या भातशेतीला जोरदार पावसाचा तडाखा बसल्यास पीक आडवे होऊन मोठे नुकसान होण्याची भीती शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, तालुक्यातील काही भागांत भातशेती पसवली असून कापणीपूर्वीच शेतकर्‍यांना पावसाच्या लहरीपणाचा फटका बसत आहे. काही दिवस पावसाने दांडी मारल्याने शेतात ओलाव्याचे प्रमाण कमी-जास्त होत असून भात पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती निर्माण झाली आहे. एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे पावसाने ओढ दिल्याने भात उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg