loader
Breaking News
Breaking News
Foto

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून स्वच्छता अभियान, महिला सेविकांचा उत्स्फूर्त सहभाग

नाणीजधाम (प्रतिनिधी) : जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने रामानंदाचार्य संप्रदायाच्या अखिल भारतीय महिला सेनेच्या वतीने १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत महाराष्ट्रासह इतर राज्यांतील ७४ जिल्ह्यांमध्ये मंदिर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या या अभियानांतर्गत तब्बल ४७१ मंदिरांची व मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. या सेवाकार्यात १२,६६० महिला सेविकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत श्रमदान केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महिला सेविकांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या अभियानातून दिला. स्वतःचा संसार आणि कौटुंबिक जबाबदार्‍या सांभाळतानाच समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखून सेवाकार्यात सहभागी होण्याची प्रेरणा जगद्गुरु नरेंद्राचार्यजी आपल्या शिष्यगणांना सातत्याने देत आहेत. त्याच प्रेरणेतून महिला सेविकांनी मंदिर आणि मंदिर परिसराच्या स्वच्छतेसाठी श्रमदान केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg