Raygad News Update : (धम्मशील सावंत ) रायगड जिल्ह्यात आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी दहा दिवसांच्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आलाय. सकाळपासूनच विविध विसर्जन घाटांवर गणेशभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळालीय. तर सायंकाळी ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’च्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाल्याचे पहावयास मिळाले. रायगड जिल्ह्यात एकूण 166 सार्वजनिक, 18378 खाजगी मूर्ती विसर्जन,अशा एकूण 18544 गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.अलिबाग, पेण, रोहा, पाली सुधागड,श्रीवर्धन खोपोली खालापूर , माणगाव, कर्जत म्हसळा, महाड पोलादपूर यांसह रायगड जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच घरगुती गणेशभक्तांकडून गणरायाच्या मूर्तींचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. काही ठिकाणी समुद्रकिनारी, नदीपात्रात तर काही ठिकाणी प्रशासनाने उभारलेल्या कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये बाप्पाला निरोप देण्यात आला.
गणरायाला निरोप देताना भाविकांकडून पुढील वर्षी लवकर येण्याचे साकडे घातले जात असून, अनेक ठिकाणी मिरवणुकांमध्ये ढोल-ताशा पथके, लेझीम आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेण्यात आल्या. शिहू बेणसे झोतीरपाडा परिसरात ही उत्साह शिगेला पोहचला होता. दरम्यान, विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून विविध विसर्जन घाटांवर सुरक्षा, वाहतूक नियंत्रण, प्रकाश व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती . गणेशभक्तांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले.दहा दिवसांच्या भक्तिमय गणेशोत्सवाची सांगता होत असताना रायगड जिल्ह्यात ‘बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’च्या जयघोषाने भावनिक वातावरण निर्माण झाले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.