loader
Breaking News
Breaking News
Foto

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे "सेवा संकल्प अभियान" अंतर्गत झालेले पहिले आणि आजपर्यंत २३ वे मरणोत्तर देहदान

रत्नागिरी : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शरीररचनाशास्त्राचा अभ्यास तसेच वैद्यकीय संशोधनासाठी मानवी देह उपलब्ध व्हावा, या उदात्त सामाजिक भावनेतून कै. नामदेव दामोदर पाध्ये (वय ८५ वर्षे, रा. जोशी वठार, नाटे) यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे मरणोत्तर देहदान करून सामाजिक बांधिलकी जपली. कै. नामदेव पाध्ये यांचे दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी अल्पशा आजाराने लोटलीकर हॉस्पिटल, रत्नागिरी येथे निधन झाले. त्यांनी दि. २० मार्च २०२५ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथे मरणोत्तर देहदानाचे इच्छापत्र सादर केले होते. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांनी दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथे देहदान केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हे देहदान शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत झालेले पहिले आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथील एकूण २३ वे मरणोत्तर देहदान ठरले आहे. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते कै. नामदेव पाध्ये यांचे पुत्र महेश पाध्ये यांना सन्मानदर्शक प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सदर मरणोत्तर देहदानावेळी शुभदा पाध्ये (सून), अर्चना गोखले, सुषमा गगनग्रास, ज्योती नेने (मुलगी), जावई तसेच डॉ. महेंद्र पाध्ये, प्रभात पाध्ये, गोपीनाथ करंबेकर, श्रीकांत गोखले यांच्यासह इतर नातेवाईक उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधीक्षक श्री. रेशम जाधव तसेच शरीररचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, प्रियल आडीवरेकर, मिथिलेश मुरकर, मिहीर लोंढे, श्रेयश जोशी, राज पेडणेकर, नितीन घोसाळकर आणि वाहनचालक सागर नारकर व प्रणय पाटील यांनी देहदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार्य केले. मरणोत्तर देहदान हे वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि भावी वैद्यकीय पिढीच्या ज्ञानवृद्धीसाठी अत्यंत मोलाचे योगदान आहे. कै. नामदेव पाध्ये यांच्या कुटुंबीयांनी घेतलेला हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg