loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर नावडी येथील सरिता कुचेकर यांचे निधन

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर नावडी येथील गणपती मंदिर परिसरातील रहिवासी सरिता सुरेश कुचेकर (वय ८७ वर्षे) यांचे शुक्रवार दिनांक २५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने नावडी परिसरात शोककळा पसरली असून, नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार व परिचितांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सरिता कुचेकर या प्रेमळ, मनमिळावू आणि कुटुंबवत्सल स्वभावाच्या म्हणून परिचित होत्या. दीर्घ आयुष्याच्या प्रवासात त्यांनी कुटुंबाला प्रेम, माया आणि संस्कारांची शिदोरी दिली. कुटुंबातील सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवत त्यांनी आपले जीवन समाधानाने व्यतीत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणून त्यांचे मार्गदर्शन आणि मायेची सावली कुटुंबीयांना लाभत होती. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांनी एक प्रेमळ आधारवड गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. सरिता कुचेकर यांची अंतिम यात्रा शुक्रवार, दिनांक २५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता संगमेश्वर नावडी गणपती मंदिराजवळील त्यांच्या राहत्या घरातून निघाली. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून त्यांना अंतिम श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg