loader
Breaking News
Breaking News
Foto

अस्तानमध्ये बिबट्याच्या दहशतीने नागरिकांमध्ये भीती; वनविभागाकडून विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना बिबट्यापासून बचावाचे मार्गदर्शन

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील अस्तान गावातील मेढेकरवाडी परिसरात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दामू पवार यांच्या बकऱ्यांच्या गोठ्यात घुसून बिबट्याने बोकडावर हल्ला केल्याची घटना घडली. त्यानंतर पवार यांच्या घराच्या अंगणातील कुत्र्याला बिबट्याने उचलून नेल्याची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये अधिकच चिंता वाढली आहे. दामू पवार यांच्या घराजवळच जिल्हा परिषद शाळा क्रमांक २, अस्तान मावळतवाडी ही शाळा असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या वतीने शुक्रवार, दिनांक. २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता शाळेत विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व ग्रामस्थांना बिबट्यापासून सुरक्षित राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी वनरक्षक परमेश्वर डोईफोडे व वनरक्षक वैभव काटेखाये यांनी बिबट्याचा वावर आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता कोणती खबरदारी घ्यावी, रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना कोणती काळजी घ्यावी तसेच लहान मुले व पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत मार्गदर्शन केले. बिबट्याच्या हालचालींबाबत नागरिकांनी सतर्क राहावे आणि बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न न करता तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या मार्गदर्शन कार्यक्रमास अस्तान मावळतवाडी शाळेतील विद्यार्थी, शिक्षका प्रियांका पाणथवणे तसेच ग्रामस्थ प्रकाश मोरे, मनोहर साळुंखे, श्रीधर साळुंखे, दिलीप मोरे, दर्शना पवार, दामू पवार, निशा पवार, नितीन पवार, मनिषा पवार, कुमार साळुंखे, वासंती पवार, संदिप पवार, संजना पवार, संज्या पवार, अनिल तांबे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. बिबट्याच्या वावरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर वनविभागाने लक्ष ठेवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून विकास मोरे यांनी व्यक्त केली आहे.खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील अस्तान गावातील मेढेकरवाडी परिसरात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दामू पवार यांच्या बकऱ्यांच्या गोठ्यात घुसून बिबट्याने बोकडावर हल्ला केल्याची घटना घडली. त्यानंतर पवार यांच्या घराच्या अंगणातील कुत्र्याला बिबट्याने उचलून नेल्याची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये अधिकच चिंता वाढली आहे. दामू पवार यांच्या घराजवळच जिल्हा परिषद शाळा क्रमांक २, अस्तान मावळतवाडी ही शाळा असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या वतीने शुक्रवार, दिनांक. २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता शाळेत विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व ग्रामस्थांना बिबट्यापासून सुरक्षित राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी वनरक्षक परमेश्वर डोईफोडे व वनरक्षक वैभव काटेखाये यांनी बिबट्याचा वावर आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता कोणती खबरदारी घ्यावी, रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना कोणती काळजी घ्यावी तसेच लहान मुले व पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत मार्गदर्शन केले. बिबट्याच्या हालचालींबाबत नागरिकांनी सतर्क राहावे आणि बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न न करता तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

या मार्गदर्शन कार्यक्रमास अस्तान मावळतवाडी शाळेतील विद्यार्थी, शिक्षका प्रियांका पाणथवणे तसेच ग्रामस्थ प्रकाश मोरे, मनोहर साळुंखे, श्रीधर साळुंखे, दिलीप मोरे, दर्शना पवार, दामू पवार, निशा पवार, नितीन पवार, मनिषा पवार, कुमार साळुंखे, वासंती पवार, संदिप पवार, संजना पवार, संज्या पवार, अनिल तांबे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. बिबट्याच्या वावरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर वनविभागाने लक्ष ठेवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून विकास मोरे यांनी व्यक्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg