loader
Breaking News
Breaking News
Foto

दुष्काळावर राजकारण नको’; उद्योगमंत्री उदय सामंतांचे विरोधकांना आवाहन

रत्नागिरी (जमीर खलफे) : महाराष्ट्रात सध्या निर्माण झालेली दुष्काळजन्य परिस्थिती अत्यंत भयावह आहे. या बिकट प्रसंगी सर्व पक्षांनी आणि नागरिकांनी एकत्र येऊन बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे, असे मत उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. या गंभीर परिस्थितीचे राजकीय भांडवल करू नये, अशी नम्र विनंती त्यांनी विरोधकांना केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पत्रकार परिषदेत बोलताना उदय सामंत म्हणाले की, राज्यातील दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन सरकार पूर्णपणे संवेदनशीलतेने काम करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्व मंत्रिमंडळ थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत आणि त्यांना धीर देण्याचे काम करत आहेत. बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन खंबीरपणे पाठीशी उभे असून, मदतीची घोषणा लवकरच केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी कालच स्पष्ट केले आहे.

टाईम्स स्पेशल

पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, शेतकरी मग तो कोकणातील असो, विदर्भातील, मराठवाड्यातील किंवा खानदेशातील असो, कुणालाही वार्‍यावर सोडले जाणार नाही. आपण सर्वजण ज्या शेतकर्‍यांमुळे दोन वेळेचे अन्न खातो, त्याच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे अशा संकटसमयी दुष्काळावर राजकारण न करता संपूर्ण महाराष्ट्र एकसंघ राहून शेतकर्‍यांच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे, असा पुनर्उच्चार त्यांनी केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg