loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गाच्या महाराजाच्या चरणी कोकणवासीयांचे साकडे

मुंबई : मुंबई व महामार्ग जन आक्रोश समितीच्या वतीने “मुंबई-गोवा महामार्गाच्या महाराजा”चा दुसरा वर्ष सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी समितीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री बाप्पाच्या चरणी भजनाचा सुंदर सोहळा पार पडला. भजनाच्या सुरांमध्ये सर्वजण दंग झाले असताना भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भजनाच्या सांगतेनंतर मुंबई-गोवा महामार्गाच्या महाराजाच्या चरणी मनापासून साकडे घालण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी कोकणी मातीचा गंध असलेल्या भावनेतून साकडे घालताना अशी प्रार्थना करण्यात आली की, “महाराजा, आमचो हा मुंबई-गोवा महामार्ग गेल्या १७ वर्षांपासून रखडलो आसा. आता तरी ह्या रस्त्याचो प्रश्न मिटू दे. कोकणात येणाऱ्या-जाणाऱ्या माणसांचो त्रास कमी होऊ दे. आमच्या कोकणवासीयांक सुरक्षित आनी चांगलो रस्तो मिळू दे.” तसेच हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी तसेच शासन-प्रशासनातील अधिकारी यांना सद्बुद्धी मिळू दे, जनतेच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाची जाणीव होऊ दे आणि रखडलेल्या कामाला गती मिळू दे, असे मनोभावे साकडे घालण्यात आले. “महाराजा, आमच्या कोकणाकडे जाणारो हा रस्तो फकत रस्तो न्हाय; आमच्या माणसांच्या सुख-दुःखाचा, विकासाचा आनी भवितव्याचा मार्ग आसा. ह्या मार्गाचो त्रास आता संपव आनी आमचो महामार्ग लवकर पूर्ण करून दे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

गेली अनेक वर्षे मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकणवासीयांना होणारा त्रास लक्षात घेता, भक्तीच्या माध्यमातून जनआक्रोश व्यक्त करत महामार्गाच्या महाराजाच्या चरणी हे साकडे घालण्यात आले. या संपूर्ण भजन व साकडे सोहळ्यास मुंबई व महामार्ग जन आक्रोश समितीचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात सर्वांनी महामार्गाचे काम लवकर पूर्ण व्हावे आणि कोकणवासीयांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मनोभावे प्रार्थना केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg