चौक, (अर्जुन कदम) आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनमन योजनेअंतर्गत करण्यात येतील यासाठी राज्य सरकार व रायगड जिल्हा परिषद यांच्या कडून सर्व प्रकारची मदत करण्यात येईल असे आश्वासन रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी दिले आहे. खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चौक हद्दीतील नानिवली येथे पीएम जनमन योजने अंतर्गत विद्यार्थी वसतिगृहाचे भूमिपूजन करताना अध्यक्ष मंगेश वाकडीकर बोलत होते.
'पीएम-जनमन' म्हणजेच प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान ही केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाची योजना आहे. देशातील अत्यंत मागासलेल्या आदिवासी जमातींचा सामाजिक आणि आर्थिक विकास करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.या अभियानांतर्गत एकूण ११ महत्त्वाच्या सुविधा पुरवल्या जात असून, त्यापैकी वसतिगृह उभारणी हा शिक्षणाला चालना देणारा एक प्रमुख भाग आहे. पीएम-जनमन वसतिगृह आदिवासी भागातील मुला-मुलींना शिक्षणासाठी सोयीचे व्हावे म्हणून या योजने अंतर्गत निवासी वसतिगृहांची निर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अत्यंत दुर्गम आणि आदिवासी भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्याची आणि जेवणाची मोफत सोय उपलब्ध करून देणे, जेणेकरून पैशांअभावी किंवा दुर्गम,दुर्लक्षित अणि प्रवासाच्या अंतरामुळे त्यांचे शिक्षण सुटणार नाही. शिक्षणा मुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ मिळाले आहे.
वसतिगृहाची आवश्यकता व त्याची शैक्षणिक उपयोगिता या वसतिगृहामुळे परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना निवासी सुविधा उपलब्ध होऊन त्यांच्या शिक्षणाला अधिक बळ मिळणार असल्याचे सभापती कृष्णा पारंगे यांनी सांगितले. सरपंच सौ.रितू ठोंबरे, भाजप उत्तर रायगड उपाध्यक्ष सुधीरशेठ ठोंबरे,माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, उपसरपंच सौ. वृषाली अंबवणे, जि.प. सदस्या सौ. वैशाली खैर, पं.स. सदस्या कमल भस्मा, प्रमिला पाटील, ग्रा.पं. सदस्य नयना झिंगे, सुभाष पवार, अश्विनी म्हात्रे, महादेव पिरकड, लक्ष्मी वाघ, तालुका आदिवासी संघटना अध्यक्ष अंकुश वाघ,विस्तार अधिकारी विनोद चांदोरकर, वरिष्ठ विस्तार अधिकारी शिक्षण शिल्पा दास, कनिष्ठ विस्तार अधिकारी देवीदास पाडवी, समग्र शिक्षा अभियानाचे कनिष्ठ अभियंता आशिष ठाकूर,ग्राम पंचायत अधिकारी गणेश मोरे यांच्यासह ग्रामस्थ व आदिवासी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी रायगड जिल्हा परिषद शाळा नानिवली येथील विद्यार्थ्यांनी वाद्यांच्या गजरात मान्यवरांचे स्वागत केले. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची शोभा वाढवली.या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या भूमिपूजनामुळे नानिवली व परिसरातील आदिवासी समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.