loader
Breaking News
Breaking News
Foto

सकाळी दाट धुके, दुपारी कडक ऊन, संध्याकाळी पाऊस, संगमेश्वर तालुक्यात विचित्र वातावरण; भातशेतीला परतीच्या पावसाचा फटका

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यात सध्या सकाळी दाट धुके, दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी पावसाची हजेरी, असे विचित्र हवामान अनुभवास येत आहे. काही दिवसांपूर्वी तालुक्यात दिवसभर धूसर वातावरण होते. आता भातपीक तयार होण्याच्या अंतिम टप्प्यात असताना परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. तालुक्यातील अनेक भागांत भाताला हळवे येऊन पीक तयार होऊ लागले आहे. काही ठिकाणी भात कापणीसाठी तयार होत असतानाच अधूनमधून पाऊस पडत असल्याने कापणीचे नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. सतत बदलणार्‍या हवामानाचा भाताच्या गुणवत्तेवर तसेच उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यंदाच्या हंगामात अतिवृष्टी, बदलते हवामान आणि विविध नैसर्गिक अडचणींमुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. त्यातच आता भातपीक तयार होत असताना परतीचा पाऊस सुरू झाल्याने शेतकर्‍यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. दरम्यान, तालुक्यातील भातशेतीमध्ये गवे, रानडुकरे तसेच इतर जंगली प्राण्यांचा वावर वाढला आहे. तयार होत असलेल्या भातपिकाचे नुकसान होत असल्याने शेतकर्‍यांना रात्रंदिवस शेताची राखण करावी लागत आहे. एकीकडे बदलते हवामान आणि दुसरीकडे जंगली प्राण्यांचा उपद्रव, अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकर्‍यांना करावा लागत आहे.

टाईम्स स्पेशल

भातपीक कापणीच्या टप्प्यावर पोहोचले असताना पुढील काही दिवसांत पावसाने विश्रांती द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. हवामानातील बदलामुळे होणार्‍या नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही होत आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg