loader
Breaking News
Breaking News
Foto

जागतिक कर्णबधिर दिन तसेच ‘सेवा संकल्प’ अभियानाच्या निमित्ताने रातांबेवाडीतील मीरा म्हाब्दी यांना श्रवणयंत्राची मदत

मंडणगड (प्रतिनिधी) - मंडणगड तालुक्यातील रातांबेवाडी येथील मीरा म्हाब्दी यांना श्रवणयंत्र प्रदान करून त्यांच्या जीवनात पुन्हा ऐकण्याचा आनंद निर्माण करण्याचा संवेदनशील उपक्रम राबविण्यात आला. जागतिक कर्णबधिर दिन तसेच ‘सेवा संकल्प’ अभियानाच्या निमित्ताने भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी यांच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते मीरा म्हाब्दी यांना श्रवणयंत्र सुपूर्द करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्रवणयंत्र मिळाल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनातील संवाद अधिक सुलभ होण्यास मदत होणार असून, या उपक्रमातून गरजू व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी भाजपा मंडणगड तालुका उपाध्यक्ष विजय दुर्गवले, रातांबेवाडी गावचे अध्यक्ष सहदेव गावडे, तसेच विश्राम म्हाब्दी, प्रकाश म्हाब्दी, मारुती म्हाब्दी, जना म्हाब्दी, ममता म्हाब्दी आणि मानसी म्हाब्दी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

‘सेवा संकल्प’ अभियानाच्या माध्यमातून समाजातील गरजू व वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा हा उपक्रम असून, सेवा, संवेदना आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला. गरजू व्यक्तींच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलविणे आणि त्यांच्या जीवनात सुलभता निर्माण करणे, हीच खऱ्या अर्थाने समाजसेवेची दिशा असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg