loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड बाजारपेठेतून ५६ वर्षीय महिला बेपत्ता; मंगला डेरवणकर यांचा शोध सुरू

खेड (प्रतिनिधी) : तालुक्यातील संगलट सुतारवाडी येथील श्रीमती मंगला बाबू डेरवणकर (वय अंदाजे ५६ वर्षे) या रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजल्यापासून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. मंगला डेरवणकर या रविवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. त्या खेड बाजारपेठ परिसरात असल्याचे कुटुंबीयांना समजले होते. मात्र, दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याचे लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी खेड बाजारपेठ, एस.टी. डेपो तसेच परिसरात त्यांचा शोध घेतला. नातेवाईक व परिचितांकडे चौकशी करूनही त्यांचा शोध लागला नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंगला डेरवणकर यांचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे: वय अंदाजे ५५ ते ५८ वर्षे, उंची सुमारे ५ फूट, रंग गोरा, बांधा मध्यम, केस काळे-पांढरे, नाक सरळ असून त्या मराठी भाषा बोलतात. त्यांच्या अंगावर पिवळ्या रंगाची साडी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मंगला डेरवणकर यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास किंवा त्या आढळून आल्यास तातडीने कुटुंबीयांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg