loader
Breaking News
Breaking News
Foto

कोका-कोला कंपनीची संरक्षण भिंत कोसळली; असगणी नाल्यालगतच्या भिंतीला वादळी पावसाचा फटका

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील असगणी येथील कोका-कोला कंपनीच्या प्लांटमध्ये वादळी पावसामुळे संरक्षण भिंत कोसळल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी, 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाचा फटका कंपनीच्या वॉल कंपाऊंडला बसला. असगणी नाल्यालगत असलेली कंपनीची संरक्षक भिंत पावसामुळे कोसळली. यापूर्वी स्थानिक नागरिकांनी कंपनीकडून सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप केला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार संबंधित ठिकाणी असलेली होल बंद करण्यात आली होती आणि त्यानंतर नुकतीच ही संरक्षण भिंत उभारण्यात आली होती. मात्र, भिंत उभारल्यानंतर काही काळातच मंगळवारी झालेल्या वादळी पावसात ही संरक्षक भिंत कोसळल्याने पुन्हा एकदा या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, भिंत नेमकी कोणत्या कारणामुळे कोसळली, याबाबत संबंधित प्रशासन आणि कंपनीकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg