loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी नगरपरिषदेचे आदर्श शिक्षक अजमुद्दिन काझी यांची सेवानिवृत्ती

रत्नागिरी - रत्नागिरी नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक विद्यालयाचे शिक्षक अजमुद्दिन बापू काझी यांची आज शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती झाली. पटवर्धन विद्यामंदीर रत्नागिरी, नगरपरिषद शाळा क्र.१ येथे आयोजित सेवानिवृत्ती कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिक्षकवृंद व त्यांच्या चाहत्यांची उपस्थिती होती. रत्नागिरी नगरपरिषद प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षक म्हणून काम करताना अजमुद्दिन काझी यांनी शिक्षणासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. त्यामुळे पालकवर्गामध्ये ते लोकप्रिय आहेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये साने गुरुजींच्या विचारांचा प्रभाव असलेले श्री. काझी सर यांना निरोप देताना त्यांचा विद्यार्थीवर्गही उपस्थित होता. सौ. काझी या देखील शिक्षिका आहेत. नेवरे गावातील ग्रामस्थांचीही उपस्थिती होती. या निवृत्ती कार्यक्रमाला मुख्याध्यापक श्री. मोटे, शिक्षकनेते विनायक हातखंबकर यांच्याह अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg