loader
Breaking News
Breaking News
Foto

पेठमाप बौद्धवाडीतील ट्रान्सफॉर्मर धोकादायक; रस्त्यालगत विद्युत यंत्रणा, दुर्घटनेची शक्यता, तातडीने उपाययोजनांची मागणी

चिपळूण (ओंकार रेळेकर) : शहरातील पेठमाप बौद्धवाडी परिसरातील रस्त्यालगत असलेला विद्युत ट्रान्सफॉर्मर आणि त्याची लोखंडी संरचना सध्या धोकादायक अवस्थेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ट्रान्सफॉर्मर रस्त्याच्या अगदी जवळ असल्याने या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने नागरिक, वाहनचालक तसेच लहान मुले ये-जा करीत असतात. त्यामुळे या ठिकाणी संभाव्य दुर्घटनेचा धोका निर्माण झाला असून, संबंधित वीज विभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. पेठमाप बौद्धवाडी परिसरातील या मार्गावर नागरिकांची सातत्याने वर्दळ असते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र, रस्त्यालगत असलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या परिसरात वाढलेली झाडी आणि अस्ताव्यस्त झालेली लोखंडी संरचना यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्युत यंत्रणा रस्त्याच्या जवळ असल्याने एखाद्या वाहनाचा धक्का बसणे, नागरिकांचा अनावधानाने विद्युत यंत्रणेच्या संपर्कात येणे किंवा अन्य कारणामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः या परिसरातून लहान मुलेही ये-जा करीत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विद्युत ट्रान्सफॉर्मर परिसरात आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना, संरक्षक कुंपण, धोक्याच्या सूचना आणि नियमित देखभाल असणे आवश्यक आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीकडे पाहता या ठिकाणी संबंधित यंत्रणेने तातडीने पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्याची गरज व्यक्त होत आहे.

टाईम्स स्पेशल

पावसाळ्यानंतर परिसरातील झाडी वाढल्याने विद्युत यंत्रणेभोवतीचा भाग अधिकच धोकादायक बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे आवश्यक आहे. संबंधित वीज विभागाच्या अधिकार्‍यांनी पेठमाप बौद्धवाडीतील या ट्रान्सफॉर्मरची प्रत्यक्ष पाहणी करून लोखंडी संरचनेची स्थिती तपासावी, परिसरातील वाढलेली झाडी हटवावी आणि आवश्यकतेनुसार संरक्षक उपाययोजना कराव्यात. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत दुर्घटना होण्याची वाट न पाहता तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg