loader
Breaking News
Breaking News
Foto

सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनचा ‘संगीत संध्या’ कार्यक्रम दिमाखात पार; रसिकांच्या प्रतिसादाने सभागृह दुमदुमले

सावंतवाडी (प्रतिनिधी): सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पहिलाच ’संगीत संध्या’ कार्यक्रम अत्यंत सुंदर, दर्जेदार आणि संस्मरणीय पद्धतीने पार पडला. या संगीतमयी मैफिलीत गायकांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस गीतांमुळे रसिक श्रोत्यांनी अक्षरशः सभागृह डोक्यावर घेतले. नवीन क्लबच्या पहिल्याच कार्यक्रमाला मिळालेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद सम्राट क्लबच्या सांस्कृतिक प्रवासातील एक सुवर्णमयी टप्पा ठरला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमात हर्ष नकाशे, कु. विधिता केंकरे, सिद्धी परब आणि सौ. स्मिता केंकरे यांनी आपल्या मधुर आणि बहारदार गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनकडे अशा गुणी आणि अष्टपैलू कलाकारांची फळी असणे ही क्लबसाठी मोठी जमेची बाजू मानली जात आहे. या संपूर्ण संगीत संध्येला सौ. प्रतिभा चव्हाण आणि गुरुप्रसाद चिटणीस यांच्या ओघवत्या आणि वैशिष्ट्‌यपूर्ण सूत्रसंचालनाने विशेष रंगत आणली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg